How to remove smell from thermos: हिवाळ्यामध्ये अनेकांना सर्दी, खोकला यांसारख्या आरोग्य समस्या उद्भवतात. त्यामुळे काही जण ऑफिसला जाताना गरम पाण्याने भरलेले थर्मास किंवा फ्लास्क घेऊन जातात. थर्मास किंवा फ्लास्कमधील पाणी तासन् तास गरम राहते. त्यामुळे घराबाहेर असतानाही लोकांना गरम पाणी पिता येते. परंतु, सतत थर्मास वापरल्याने हळूहळू त्यातून कुबट वास येऊ लागतो. ही दुर्गंधी दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.
थर्मासमधून दुर्गंधी का येते?
थर्मास किंवा फ्लास्क बराच वेळ वापरल्यामुळे त्या बाटलीच्या आतून दुर्गंधी येऊ लागते. नीट साफसफाई न केल्यामुळे ही दुर्गंधी येऊ लागते. अशा परिस्थितीत थर्मासची साफसफाई करणे खूप कठीण होते. परंतु, थर्मास किंवा फ्लास्कमधून येणारा वासदेखील सहजपणे दूर केला जाऊ शकतो.
थर्मास किंवा फ्लास्क या पद्धतीने करा स्वच्छ
थर्मास स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम ते पाण्यात भिजवा. त्यानंतर त्यामध्ये डिटर्जंट घाला आणि ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. ते व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी त्यात कापसाचा तुकडा किंवा टॉवेल टाकून स्वच्छ करा.
हेही वाचा: रात्री झोपण्यापूर्वी २० मिनिट ध्यान करण्याचे फायदे ठाऊक आहेत का?
तसेच वर्तमानपत्राच्या मदतीनेही तुम्ही फ्लास्क स्वच्छ करून, त्यामधून येणारी दुर्गंधी सहजपणे दूर करू शकता. त्यासाठी संपूर्ण थर्मास किंवा फ्लास्क गरम पाणी व डिटर्जंटने नीट धुवा आणि मग तो कोरडा करा. आता स्वच्छ आणि कोरड्या वर्तमानपत्राचे छोटे तुकडे करून ते तुकडे आतमध्ये ठेवा आणि झाकण काही वेळ बंद ठेवा. आता फ्लास्कमधून वर्तमानपत्र काढा आणि कोमट पाण्याने ते स्वच्छ करा. या प्रकरणात फ्लास्कमधून येणारा दुर्गंध निघून जाईल. त्याव्यतिरिक्त तुम्ही थर्मास स्वच्छ करण्यासाठी मिठाचादेखील वापर करू शकता.