कर्करोग हा अनेक धोकादायक आजारांपैकी एक असून त्याचे अनेक प्रकारही आहेत. बहुसंख्य लोक प्रोस्टेट, पोट, कोलोरेक्टल, यकृत, थायरॉईड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाने बाधित आहेत. महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो. महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत. यातीलच एक समज म्हणजे, जास्तवेळ ब्रा घातल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. मात्र, यात किती तथ्य आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे.

स्तनाचा कर्करोग म्हणजे काय?

डब्ल्यूएचओच्या मते, महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची समस्या अधिक सामान्य होत आहे. दरवर्षी जगभरातील सुमारे २.१ दशलक्ष महिलांना स्तनाचा कर्करोग होतो. या स्थितीत, जनुकांच्या बदलामुळे, स्तनाच्या पेशींचे विभाजन होऊ लागते आणि त्या अनियंत्रितपणे वाढू लागतात किंवा पसरू लागतात.

Early Symptoms of Cancer : ‘ही’ लक्षणं दिसत असल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका; असू शकतो कर्करोगाचा धोका

ब्रा घातल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो का?

तज्ज्ञांच्या मते, ब्रा आणि ब्रेस्ट कॅन्सरचा थेट संबंध आढळून आलेला नाही. याचा अर्थ हा निव्वळ भ्रम आहे, त्यामुळे महिलांमध्ये गैरसमज वाढत आहेत. अनेक ठिकाणी असंही ऐकायला मिळाले आहे की अंडरवायर ब्रा किंवा टाईट ब्रा घातल्याने लिम्फमधील रक्ताभिसरण थांबते, ज्यामुळे कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो, पण हा देखील एक भ्रम आहे. म्हणजेच, ब्रा घातल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, हा समज चुकीचा आहे.

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे

जेव्हा स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होतो तेव्हा त्यांना स्तनांमध्ये गाठ, लाल स्तनाग्र, गुठळ्या किंवा अंडरआर्म्समध्ये सूज, स्तनाच्या आकारात बदल किंवा स्तनाग्र भागातून चिकट द्रव बाहेर येणे अशी लक्षणे दिसून येतात.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Story img Loader