आजकाल चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे लोकांना छातीत दुखणे, हृदयाच्या समस्या, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. हृदयविकाराचा झटका हा एक असा आजार आहे, ज्यामुळे सध्या बहुतेक लोकांचा मृत्यू होत आहे. हृदयाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा आपले हृदय कमकुवत असते तेव्हा स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी अनेक प्रकारचे मोठे आजारही जडायला लागतात. मग ती उच्च रक्तदाबाची समस्या असो किंवा श्वास घेण्यात अडचण असो. अशा परिस्थितीत निरोगी शरीरासाठी हृदय निरोगी असणे खूप महत्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • उच्च रक्तदाब असणे

काही लोकांना बीपीचा त्रास असतो. अशा परिस्थितीत, या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. कारण हे देखील कमकुवत हृदयाचे लक्षण आहे. वास्तविक, जेव्हा तुमचे हृदय कमकुवत होते तेव्हा अशा प्रकारची समस्या उद्भवते.

  • खांदा आणि छाती दुखणे

जर तुमचे खांदे आणि छाती सतत दुखत असेल, तर ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही. शक्य असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण हे दुखणे सामान्य असेलच असे नाही. हे हृदय कमकुवत असण्याचे लक्षण असू शकते.

  • घोरणे आणि झोपेसंबंधी समस्या

काही लोकांना घोरणे आणि झोपेशी संबंधित समस्या असतात. असे लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि उपचार करत नाहीत. ही समस्या देखील कमकुवत हृदयाचे लक्षण आहे. अशा स्थितीत सतर्क राहावे लागेल, अन्यथा नंतर त्रास होऊ शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)