पत्नीला मधुमेह झाल्यास पतीलाही मधुमेह होण्याची शक्यता असल्याचा दावा भारतीय वंशाच्या एका शास्त्रज्ञाने केला आहे. पत्नीला मधुमेह झाल्यास पतीला टाईप-२ चा मधुमेह होण्याची २६ टक्के शक्यता असते असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
यावर मकग्रिल युनिव्हर्सिटी हेल्थ सेंटरमध्ये व्यापक प्रमाणात संशोधन केले गेले. यात मधुमेह होण्यास कारणीभूत असलेल्या काही कारणांचा शोध आणि सखोल अभ्यास करण्यात आला असल्याचे या हेल्थ सेंटरमधील वरिष्ठ संशोधक डॉ.काबेरी दासगुप्ता यांनी सांगितले. पत्नीला मधुमेह असल्यास पतीलाही त्याचा धोका असल्याचे आढळून येणे चिंताजनक असले तरी, हे संशोधन मधुमेहासंदर्भातील उपचारपद्धतीसाठी भाविष्यातील संशोधकांना मार्गदर्शक ठरू शकते. त्याचबरोबर संशोधनातून जोडीदारामुळे तुमच्या आरोग्यावर होत असलेल्या बदलावर लक्ष ठेवणेही सोपे होईल असेही दासगुप्ता म्हणाले.
आणखी वाचा