How to make a suitcase smell better: बऱ्याचदा घरातील न वापरले जाणारे कपडे लोक सुटकेसमध्ये भरून ठेवतात. परंतु, साफसफाई करताना सुटकेस उघडली जाते तेव्हा त्यातून कुबट, उग्र वास येऊ लागतो. अनेकदा या वासाने आपण त्रस्त होतो. याशिवाय कपड्यांमधून येणारा ओलाव्याचा वास बराच काळ तसाच राहतो. अशा परिस्थितीत सुटकेसमधून येणारा उग्र वास दूर करण्यासाठी तुम्ही या टिप्सचा अवलंब करू शकता. इतकेच नाही तर या टिप्स कपड्यांमधून येणारा दुर्गंधदेखील दूर करू शकतात.

बंद सुटकेसमधून येणारा उग्र वास असा करा दूर

सुटकेसमधून येणारा उग्र वास दूर करण्यासाठी प्रथम सुटकेस उघडा आणि बाजूला ठेवा. नंतर ओल्या कापडाने सुटकेस स्वच्छ करा. असे केल्याने सुटकेस पूर्णपणे स्वच्छ होते.

या व्यतिरिक्त पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि नंतर सुटकेस कापडाने स्वच्छ करा. अशाप्रकारे सुटकेस स्वच्छ होते आणि नंतर त्याला चांगला वास येऊ लागतो. लिंबू हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगलदेखील आहे, जे सुटकेसमधून येणारा वास दूर करण्यास मदत करते. त्याच वेळी, लिंबाचा तीव्र वास येऊ लागतो.

लिंबाने सुटकेस स्वच्छ केल्यानंतर, सुटकेस एकदा कोरड्या कापडाने स्वच्छ करा. अशा प्रकारे सुटकेस स्वच्छ केल्यानंतर तुम्ही त्याचे चाक आणि साखळीदेखील स्वच्छ करावी. असे केल्याने सुटकेसचा वास पूर्णपणे निघून जातो.

त्यानंतर सुटकेस सूर्यप्रकाशात ठेवा. सूर्यप्रकाश सुटकेसमधील सर्व दुर्गंधी आणि ओलसरपणा काढून टाकतो. तसेच, सुटकेसमध्ये नवीन कपडे ठेवल्याने, सुटकेसमधील कपडेदेखील स्वच्छ राहतात आणि त्यांना चांगला वास येतो.

Story img Loader