Protect Wardrobe From Moisture: पावसाळ्याच्या दिवसात वॉर्डरोबमधील आर्द्रतेमुळे बऱ्याचदा कपड्यांना दुर्गंधी येते. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते. त्यात अनेकदा काही कपडे बरेच दिवस आपल्या वापरात नसतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा त्रास उद्भवू शकतो. जर तुम्हीदेखील अशा समस्येला सतत सामोरे जात असाल तर पुढील काही टिप्स तुमची नक्कीच मदत करतील. या टिप्सच्या मदतीने तुमच्या वॉर्डरोबमधील दुर्गंधीही दूर होईल आणि ओलावादेखील दूर होण्यास मदत होईल.
वॉर्डरोबमधील आर्द्रतेची समस्या अशी दूर करा
ओले कपडे ठेऊ नका
पावसाळ्यात कपडे सुकायला खूप वेळ लागतो, त्यामुळे अनेकदा काही जण घाईगडबडीत ओले व अर्धवट सुकलेले कपडे ठेवतात. अशावेळी वॉर्डरोबमध्ये दुर्गंधी वाढते, त्यामुळे नेहमी सुकलेले कपडे वॉर्डरोबमध्ये ठेवा.
कापूर
ओलावा आणि कपड्यांचा दुर्गंध कमी करण्यासाठी तुम्ही वॉर्डरोबच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा, यामुळे दुर्गंधी कमी होईल. जास्त वास येत असल्यास वॉर्डरोबचे दरवाजे काही वेळ उघडे ठेवा.
सिलिका जेल
वॉर्डरोबमधील ओलावा काढून टाकण्यासाठी त्यात सिलिका जेलचे पॅकेट ठेवू शकता. सिलिका जेल नैसर्गिक ओलावा शोषून घेण्याचे काम करते. यामुळे वॉर्डरोबमधील ओलाव्यासह दुर्गंधीदेखील दूर होण्यास मदत होईल.
साफसफाई
वॉर्डरोबमधील ओलावा दूर करण्यासाठी सातत्याने वॉर्डरोबची साफसफाई करायला हवी. साफसफाईमुळे वॉर्डरोब नेहमी स्वच्छ राहील, ज्यामुळे वॉर्डरोबमधील ओलावा आणि वास दूर होईल.
हेही वाचा: तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
सुगंधी स्प्रे मारा
वॉर्डरोबमधील दुर्गंध घालवण्यासाठी सुगंधी स्प्रे मारा, ज्यामुळे खराब वास काही प्रमाणात कमी होईल.