अंडाशयाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी थोडा दिलासा देणारी बातमी आहे. संशोधकांनी कुत्र्याच्या मदतीने अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान करणारे तंत्र विकसित केले आहे. ठराविक प्रशिक्षण देण्यात आलेला कुत्रा रासायनिक संयुगांच्या मदतीने अंडाशयाला कर्करोग झालेली जागा १०० टक्के बरोबर दर्शवितो.
ओहलिन फ्रँक या प्रशिक्षण देण्यात आलेला लॅब्रोडोर जातीच्या कुत्र्याला अंडाशयाच्या कर्करोगाच्या उती शोधणे शक्य झाले आहे, असा दावा या संशोधनावर काम करणाऱ्या सशोधकांनी केला आहे.      
पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या आंतरशास्त्रीय विभागाच्यावतीने हा संशोधनाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. फ्रँक आणि त्याचा सहकारी प्रशिक्षणार्थी कुत्रा मॅकबेनी चेंम्बर्लिन या संशोधन कार्यक्रमाचा एक भाग आहेत. फ्रँक व मॅकबेनी यांच्या मदतीने पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाचे संशोधक कर्करोगाचे निदान करणाऱया चाचण्यांना मदत होण्यासाठी रसायनाचा शोध घेत आहेत. या संशोधनाच्या मदतीने कर्करोगामुळे होणारी मनुष्यहानी टळणार असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.
मॅकबेनी कुत्र्याला बाँम्ब, अमली पदार्थ आणि हरवलेल्या लोकांचा शोध घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
आधीच्या अंडाशय कर्करोगाच्या गंधावरून आता हे दोघे कर्करोगाचे निदान करण्यास मदत करणार आहेत. अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान साधारणपणे उशिराच होते. त्यामुळे त्यावर उपचार देखील उशिरा सुरू होतात. या संशोधनामुळे अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान लवकर होणार असून, त्यावर ताबडतोब उपचार सुरू करता येणार असल्याची माहिती एबीसी न्यूज डॉट कॉमने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा