रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याची माहिती तुम्ही घरात पाळलेला आणि विशेष प्रशिक्षण दिलेला कुत्रा तुम्हाला देऊ शकतो, असे एका संशोधनातून उघड झाले. आतापर्यंत मालकाच्या संरक्षणाची जबाबदारी उचलणारे घरातील पाळीव कुत्रा आता घरातील रुग्णाच्या आरोग्याचीही काळजी घेऊ शकतो, असे या सशोधनामुळे स्पष्ट झाले.
प्रशिक्षण देलेला कुत्रा रक्तातील साखरेचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत घटल्याबद्दल माहिती देऊ शकतो का, याबद्दल ब्रिस्टॉल विद्यापीठातील प्राध्यापकांनी संशोधन केले. रक्तातील साखरेचे प्रमाण अत्यंत कमी झाले, हे प्रशिक्षित कुत्रा ओळखू शकतो का, याचा शोध या संशोधनामध्ये घेण्यात आला. त्यातून प्रशिक्षित कुत्रा यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे दिसून आले. रुग्णाच्या श्वासाचा वास घेऊन संबंधित कुत्रा त्याच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण खूप घटले आहे , याबद्दल माहिती देऊ शकतो. कुत्र्यामध्ये वास घेऊन शोध लावण्याची क्षमता तीव्र असते. त्याचाच वापर करून रुग्णातील साखरेच्या धोकादायक पातळीबद्दल तो माहिती देऊ शकतो, असे संशोधकांना आढळले.
यासाठी सुमारे ७० प्रशिक्षित कुत्र्यांचा आणि त्यांच्या मालकांचा अभ्यास करण्यात आला. मालकाच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी झाली की प्रशिक्षित कुत्रे त्यांना अलर्ट करण्याचे काम करीत असल्याचे आढळून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा