मानसाचा प्राण्यांमधील सर्वात जवळचा मित्र म्हणजे कुत्रा. या कुत्र्याचा त्याच्या मालकाचे भले करण्यात मोठा वाटा असू शकतो.
पाळलेल्या कुत्र्याच्या अभिवृत्तीवरून त्याच्या मालकावर एखादे संकट येणार असल्याचे आधीच समजू शकते असे एका अभ्यासामधून समोर आले आहे.   
न्यू कॅसल विद्यापीठाच्या संशोधकांनी कुत्र्यांच्या गळ्यामध्ये त्याच्या हलचाली पडताळण्यासाठी सेन्सर लावले होते. संशोधकांनी केलेल्या निरिक्षणांमधून कुत्र्यांच्या चघळणे, भुंकणे, बसणे व माती उकरणे अशा वेगवेगळ्या १७ हलचाली टिपल्या. या निरिक्षणांवरून सामान्य कुत्र्यांचे वागणे कसे असते ते संशोधकांनी जाणून घेतले.  
संशोधकांना या अभ्यासासाठी हाय-टेक वॉटरप्रुफ पट्टा बनवून तो कुत्र्यांच्या गळ्यामध्ये बांधावा लागला. या पट्ट्यामध्ये बसवलेल्या प्रवेगमापकामुळे(अक्सेलेरोमीटर) जास्त अंतरावरील कुत्र्यांच्या हलचाली देखील नोंदवता आल्या. या हलचालींवरून संशोधन गटाने वेगवेगळ्या जातींच्या कुत्र्यांच्या काही नोंदी केल्या.     
“हजारो वर्षांपासून कुत्रा मानसाबरोबर राहत आला आहे. त्यामुळे दोघांमध्ये चांगल्या प्रकारची भावणीक व सामाजिक बांधिलकी निर्माण झाली आहे,” असे    
न्यू कॅसल विद्यापीठाच्या संशोधक गटातील अभ्यासक निल्स हॅमर्ला म्हणाले.
“कुत्रा हा प्राणी भौतिक व भावणीक पातळीवर त्याच्या मालकावर अवलंबून असतो. त्यामुळे मालकाचे बरे-वाईट हे देखील कुत्र्यांवर परिणाम करणारे ठरते,” असे हॅमर्ला पुढे म्हणाले.      
कुत्र्याच्या चालण्यामध्ये, त्याच्या खाण्यामध्ये व वागण्यात फरक आढळल्यास त्याच्या मालकाच्या कुटूंबातील वयस्कर व्यक्तींना भविष्यामध्ये कुणाची तरी मदत लागणार असल्याची पूर्व सुचना असू शकते असा दावा या संशोधक गटाने केला आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा