बदलते खानपान यामुळे अनेकांना मुतखड्यासारख्या वेदनादायी समस्येचा सामना करावा लागत आहे. मुतखडा होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. पण जास्तीत जास्त ही समस्या खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे होते. मीठ आणि शरीरातील इतर खनिज जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा मुतखडा होतो. याचा काही ठरलेला आकार नसतो. पण याबाबत असलेल्या अनेक गैरसमजामुळे यावर नेमका उपाय करणं अनेकांना कठिण होऊन बसतं. मुतखडा असताना काय खावे काय खाऊ नये, अशा अनेक महत्वाच्या गोष्टी लोकांना माहीत नसतात. आणि या गोष्टी माहीत नसल्याने अनेकांची ही समस्या अधिक वाढते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुतखडा असल्यास ‘या’ फळाचे सेवन करणे पडेल महागात

शरीराच्या विविध समस्यांवर उपयुक्त असलेले नैसर्गिक अन्नपदार्थ फायदेशीर असले तरी, त्याचे शरीराला नुकसानही होते. अशाच औषधी गुणधर्म असलेल्या फळे आणि भाज्यांच्या श्रेणीत टोमॅटोचा समावेश होतो. टोमॅटोचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु, कोणत्याही गोष्टीचे योग्य प्रमाणात सेवन केले नाही, तर ते हानिकारक देखील ठरू शकते. अशा परिस्थितीत टोमॅटोचे आरोग्यदायी फायदे तसेच आरोग्यावर होणारे नुकसान जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला टोमॅटोचे सेवन कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकेल.

(आणखी वाचा : Cholesterol: खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आजपासून खाण्यास सुरूवात करा ‘हे’ पदार्थ; हृदय राहील निरोगी, ठणठणीत!)

टोमॅटोच्या सेवनाचे दुष्परिणाम

  • मुतखड्याची समस्या असेल तर तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्या. संशोधनानुसार टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. टोमॅटोमध्ये आढळणारे कॅल्शिअम ऑक्सलेट किडनीसाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे मुत्रमार्गासह किडनीत खडे तयार होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत किडनी स्टोनची लक्षणे दिसल्यास टोमॅटोचे सेवन तत्काळ थांबवावे.
  • टोमॅटोमध्ये साल्मोनेला नावाचा एक बॅक्टेरिया असतो. जेव्हा जास्त प्रमाणात टोमॅटोचे सेवन केले जाते. तेव्हा अतिसाराची समस्या होऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी टोमॅटोचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे. प्रत्येकाला लाल टोमॅटो आवडतात. परंतु निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी टोमॅटो मर्यादित प्रमाणात खावेत.
  • टोमॅटोमध्ये हिस्टामाइन नावाचे कंपाऊंड असते ज्यामुळे त्वचेवर पुरळ किंवा एलर्जी होऊ शकते. टोमॅटोचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तोंड, चेहरा आणि जिभेवर सूज येणे, शिंका येणे, घश्यात जळजळ होण्याची तीव्र लक्षणे उद्भवू शकतात. या समस्या टाळण्यासाठी टॉमॅटोचे योग्य प्रमाणात सेवन करणं उत्तम ठरेल.