हिंदू धर्मातील सर्व सोळा संस्कारांमध्ये नामकरण विधीला विशेष महत्त्व आहे. मुलाच्या जन्मानंतर नामकरण विधीनुसार केले जाते. मात्र सध्या पालक मुलाच्या जन्मापूर्वीच इंटरनेटद्वारे वेगवेगळ्या ठिकाणांहून मुलांची पूर्णपणे भिन्न नावे शोधतात. हिंदू धर्मानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या जन्माच्या वेळी, त्या वेळी आकाशातील ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींच्या आधारे त्याचे भाग्य ठरवले जाते. हिंदू धर्मात, मुलगा किंवा मुलगी यांच्या नावाबाबत काही नियम आहेत. धार्मिक शास्त्राच्या आधारे मुलाचे नाव ठेवल्याने मुलाचे जीवन, वागणूक, स्वभाव आणि नशिबावर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार मुलाच्या नावात नेहमी अर्थ असणे आवश्यक आहे. नावाचा मुलाच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत राहतो. म्हणून, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की मुलाचे एक अर्थपूर्ण नाव असावे.चला जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रात मुलाचे नाव ठेवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेव्हा मूल जन्माला येते त्यावेळी त्याची रास निश्चित केली जाते. ज्योतिषी मुलाची कुंडली बनवताना त्याची राशीच्या आधारावर मुलाच्या नावाचे पहिले अक्षर सांगतात. हे अक्षर त्यावेळचे ग्रह, नक्षत्र आणि राशीच्या गणनेवर आधारित आहे, ज्योतिषशास्त्रानुसार राशीचा प्रभाव मुलाच्या विकासावर आणि भविष्यावर होतो. हिंदू धर्मात मुलाचे नाव ठरवताना या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार मुलगा किंवा मुलगी जन्मल्यानंतर ११व्या, १२व्या आणि १६व्या दिवशी नामकरण विधी केला जातो. परंतु पौर्णिमा आणि अमावास्येला मुलाचे नामकरण विधी कधीही करू नये, असं शास्त्रात सांगितलं आहे.

Jyotish: कुंडलीत राहू-केतूच्या वाईट स्थितीमुळे येतात अडथळे; जाणून घ्या ज्योतिषशास्त्रातील उपाय

कोणतेही शुभ कार्य करताना शुभ नक्षत्रांचे विशेष महत्त्व असते. अशा स्थितीत नामस्मरण करताना शुभ नक्षत्रात काळजी घ्यावी. ज्योतिष शास्त्रानुसार सर्व २७ नक्षत्रांपैकी काही नक्षत्र शुभ कार्यासाठी खूप चांगले मानले जातात तर काही अशुभ मानली जातात. अनुराधा, पुनर्वसु, मघा, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्र, शतभिषा, स्वाती, धनिष्ठा, श्रवण, रोहिणी, अश्विनी, मृगशीर, रेवती, हस्त आणि पुष्य नक्षत्र हे बालकाचे नाव ठेवण्यासाठी अत्यंत शुभ मानली जातात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont make mistakes when naming a baby know rules of astrology rmt