स्वयंपाक घरात काम करत असताना लहानमोठ्या जखमा होणे साहजिक आहे. कधी भाजी चिरताना बोट कापते तर कधी हात भाजतो. बोट कापल्यावर आपण अँटिसेप्टिक औषधांची मदत घेतो. परंतु भाजल्यावर आपण काही सामान्य चुका करतो. त्यामुळे त्वचेची जळजळ कमी होण्याऐवजी आणखीनच वाढते. स्वयंपाकघरात काम करताना महिलांचे हात अनेकदा भाजतात. अशावेळी जळजळ असह्य झाल्यावर त्यातून आराम मिळवण्यासाठी आपण बर्फापासून ते टूथपेस्टपर्यंत अनेक गोष्टींचा वापर करून पाहतो. पण तुम्हाला या गोष्टींचे दुष्परिणाम माहित आहेत का? जर नसेल, तर आज आपण याबद्दल जाणून घेऊया.

बर्फ चोळणे :

जळजळ शांत करण्यासाठी लगेच त्वचेवर बर्फ चोळला जातो. अर्थात त्यामुळे तुमची जळजळ कमी होते. पण भाजल्यानंतर बर्फ लावल्याने त्वचेवर उष्ण आणि थंड जखम मिसळते. ज्यामुळे तुम्ही थर्मल इजेचे बळी होऊ शकता.

Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
These simple tips will help to make a delicious food
जेवण बनवताना खूप धावपळ होते? ‘या’ सोप्या टिप्स रूचकर जेवण बनवण्यासाठी करतील मदत
Why You Should Avoid Reheating Rice - Expert's Warning Reheating rice cause food poisoning
महिलांनो रात्री शिल्लक राहिलेला भात सकाळी पुन्हा गरम करून खाता का? ‘हे’ गंभीर परिणाम ऐकून धक्का बसेल
Zeenat Aman shares her pill swallowing horror story
“औषध घेताना गोळी घशात अडकली अन् माझा श्वास…..”; झीनत अमानने सांगितला भयावह किस्सा; तुमच्याबरोबर असे घडले, तर काय करावे?
kitchen cloth cleaning tips hacks
किचनमधील तेल, मसाल्याच्या डागांमुळे तेलकट मळकट झालेले फडके काही मिनिटांत होईल साफ; वापरा फक्त ‘या’ सोप्या टिप्स
What Happens To Your Body When You Eat A Clove Daily?
रिकाम्या पोटी दररोज एक लवंग खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होईल?; वाचाच एकदा डॉक्टरांनी सांगितलेले आश्चर्यकारक फायदे…
gas prevention tips in marathi
Gas Prevention Tips: ‘या’ पद्धतीने चवळी बनवल्यास गॅसपासून होईल सुटका? हा जुगाड खरंच काम करेल का? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Skin Care Tips : उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात का? हे दोन उपाय करा आणि चेहऱ्यावरील चिकटपणा घालवा

टूथपेस्ट लावणे :

भाजल्यानंतर वेदना कमी करण्यासाठी त्या भागावर टूथपेस्ट लावणे देखील सामान्य आहे. सामान्य संकल्पनेनुसार, टूथपेस्ट थंड असते, त्यामुळे जळजळ कमी होते. परंतु असे अजिबात नाही. टूथपेस्ट त्वचेची छिद्रे अडवते, ज्यामुळे जखम बरी होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे तुमची जळजळ बराच काळ कमी होत नाही.

फोड फोडणे :

भाजल्यावर बऱ्याचदा त्वचेवर फोड येतात. यावेळी या फोडांपासून मुक्त होण्यासाठी काही लोक हे फोड फोडतात आणि त्यातील पाणी काढून टाकतात. तथापि, यामुळे त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो आणि समस्या लवकर सुटण्याऐवजी दीर्घकाळ टिकते. म्हणून, फोड फोडण्याऐवजी, त्यावर ड्रेसिंग करणे चांगले आहे.

Health Tips : आंब्याची कोय सुद्धा आहे फार उपयोगी; ‘या’ आजारांवर ठरु शकते रामबाण उपाय

उन्हाचा परिणाम :

भाजल्यानंतर सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क सर्वात धोकादायक आहे. सूर्याची हानिकारक किरणे तुमची जळजळ वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे त्वचेवर फोड येण्याची भीतीही असते. त्यामुळे उन्हात बाहेर जाताना भाजलेली झालेली त्वचा झाकायला विसरू नका.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Story img Loader