कानात अनेकदा घाण साचते, यामुळे आपल्याला ऐकण्यात समस्या येतात. या समस्येवर मात करण्यासाठी आपण कान स्वच्छ करतो, परंतु काही गोष्टींची काळजी न घेतल्यास आपल्या शरीराच्या या विशिष्ट भागाला खूप नुकसान होऊ शकते. कानात मळ तयार होणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे, ती आपल्या कानाच्या पडद्याचे रक्षण करण्यासाठी असते, परंतु जर ते जास्त प्रमाणात जमा झाले तर ऐकण्यात समस्या येतात. कान साफ ​​करताना लोक कोणत्या चुका करतात ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कान साफ ​​करताना अशी चूक करू नका

  • इअरबड्स वापरणे धोकादायक

अनेक लोक कां स्वच्छ करण्यासाठी बिनदिक्कतपणे इअरबड्स वापरतात, परंतु हा योग्य मार्ग नाही. हे कानातला मळ आतमध्ये ढकलते, ज्यामुळे कानाचा पडदा फाटण्याचा धोका निर्माण होतो.

Health Tips : सकाळी नाही, तर रात्री झोपण्यापूर्वी प्या गरम पाणी; मिळतील ‘हे’ चार आश्चर्यकारक फायदे

  • या गोष्टी कानात घालू नका

अनेक लोक कान स्वच्छ करण्यासाठी टूथपिक्स, सेफ्टी पिन, चाव्या, हेअर क्लिप यासारख्या गोष्टी वापरतात, त्यामुळे कानाला दुखापत किंवा रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. यामध्ये कानाचा पडदा खराब होऊन तुम्ही बहिरेही होऊ शकता.

  • इअर कॅंडेलिंग टाळा

सोशल मीडियाच्या युगात आजकाल इअर कॅंडेलिंग खूप लोकप्रिय होत आहे, परंतु बहुतेक ओटोलॅरिन्गोलॉजिस्ट हे तितके प्रभावी मानत नाहीत. तसेच, ही पद्धत धोकादायक आहे, कारण यामुळे चेहरा, केस, बाहेरील कान आणि कानाचा आतील भाग भाजू शकतो.

रात्री प्रकाशात झोपण्याची सवय ठरू शकते अनेक आजारांचे कारण; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

कान स्वच्छ करण्यासाठी काय करावे?

तुम्ही स्वतः कान स्वच्छ न करता ओटोलॅरिन्गोलॉजिस्टची मदत घ्यावी हे सर्वात उत्तम ठरेल. मात्र जर तुम्हाला स्वत:ला काम स्वच्छ करायचा असेल, तर कानात ग्लिसरीन, मिनरल ऑइल किंवा मोहरीच्या तेलाचे काही थेंब टाकून मनातील मळ मऊ करा आणि नंतर सॉफ्ट टिश्यूच्या मदतीने स्वच्छ करा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont make these mistakes when cleaning your ears otherwise deafness may occur pvp
Show comments