सध्याच्या डिजीटल जमनान्यात आपण प्रत्येक गोष्ट ऑनलाइन पद्धतीने करण्यावर भर देतो. त्यातील एक महत्वाची आणि मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी सुविधा म्हणजे ऑनलाईन कम्युनिकेशन, या संवाद प्रणालीमुळे आपली अनेक कामे सोपी झाली आहेत यात शंका नाही. आजकाल प्रत्येक गोष्टीचं आमत्रंण लोक ऑनलाईन देतात. शिवाय याद्वारे आपण अनेक महत्वाचे संदेश इतरांपर्यंत सहज पोहोचवतो..
मात्र, प्रत्येक गोष्टीच्या संवादासाठी ही पद्धत योग्य नसल्याचंही समोर आलं आहे. कारण अनेक नात्यांमध्ये ऑनलाइन चॅटिंगमुळे गैरसमज निर्माण झाल्याचं उघडकीस आलं आहे. कारण कितीही उत्तम प्रकारे ऑनलाईन चॅटिंग केलं तरीही आपल्या मनातील भावना समोरच्यापर्यंत तशीच पोहचेल हे सांगणं कठिण आहे. त्यामुळे अनेक नात्यांसाठी समोरासमोर संवाद साधणं हे ऑनलाईन चॅटिंगपेक्षा फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं. कारण टेक्स आणि मेसेजच्या माध्यमातून अनेकदा अर्थाता अनर्थ घडतो.
हेही वाचा- सकाळी उठल्यावर तुमचा चेहराही सुजलेला दिसतो? तर यामागे असू शकतात ‘ही’ गंभीर कारणे, जाणून घ्या
ऑनलाइन चॅटिंग करताना तुम्ही अनेकदा समोरच्याला ‘मला असे म्हणायचे नव्हते’ असे स्पष्टीकरण दिले असेल. हे असे घडते जेव्हा आपले विचार किंवा शब्द ते ज्या पद्धतीने बोलले जातात त्याप्रमाणे समोरच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे अनेकवेळा नातेसंबंध बिघडण्याची परिस्थिती निर्माण होते. समोरासमोर बोलतना अनेक गोष्टी सांगण्यासाठी खूप धैर्य लागते, त्या उलट ऑनलाइन चॅटिंगमध्ये अनेक वेळा काही मर्यादा ओलांडल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच ५ गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्या चुकूनही ऑनलाइन चॅटिंग करताना बोलू नये.
मेसेजवर कधीही या ५ गोष्टींबाबतची चर्चा करु नका –
माफी मागणे –
हेही वाचा- तोंडाच्या कर्करोगाची समस्या उद्धभवताच चेहऱ्यासह घशात जाणवतात ‘ही’ लक्षणे; चुकूनही दुर्लक्ष करू नका
जर तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी एखाद्याची माफी मागायची असेल, तर नेहमी समोरासमोर जाऊन माफी मागा. कारण अनेकदा असे दिसून येते की मेसेजद्वारे माफी मागितल्यावर समोरची व्यक्ती असभ्य वर्तवणूक दाखवते किंवा ती मेसेजकडे दुर्लक्ष करते. त्याच कारण म्हणजे तो व्यक्ती तुमच्या भावना नीट समजू शकत नाहीत, कारण तो तुमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहू शकत नाही.
अपमान –
जेव्हा कोणी एखाद्या गोष्टीबद्दल रागवत किंवा नाराज होतं तेव्हा ते मेसेजद्वारे तुमच्यावर राग व्यक्त करू शकतात किंवा तुमच्या भावना दुखावतील अशा गोष्टी बोलू शकतात. मात्र, समोरासमोर संवाद करताना समोरच्या व्यक्तीकडे पाहून परिस्थितीचा अंदाज लावणे सोपे जाते. समोरची व्यक्ती दु:खी आहे किंवा नाराज आहे हे आपण समजू शकतो. शिवाय तो नाराज असल्यामुळे रागवल्याचंही आपणाला समजतं. मात्र, ऑनलाईन चॅटिंग करताना तो व्यक्ती असा का बोलतोय हे समजत नाही.
गुपित –
काही महत्वाची गुपित समोरासमोर संवाद करत असणाच उघडली पाहिजेत. कारण चॅटिंगमध्ये अनेक गोष्टी सेव्ह राहतात. अशा स्थितीत तुमचं एखादं गुपित जर कुणाच्या चॅट लिस्टमध्ये असेल तर ते कुणी वाचणार नाही? ना अशी भीती मनात कायम राहते.
फ्रस्ट्रेशन –
फ्रस्ट्रेशन दूर करण्यासाठी कधीही चॅटिंगचा पर्याय निवडू नका. कारण अशा स्थितीत समोरची व्यक्ती तुमचा चुकीचं समजू शकते. शिवाय त्याच्यामनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतो.
आर्ग्युमेंट –
कोणत्याही गोष्टीवर आर्ग्युमेंट करण्यासाठी चॅटिंग हा एक चांगला पर्याय नसल्याचं सिद्ध होतं. कारण अशा स्थितित दोघेही आपापली बाजू मांडत असतात त्यामुळे एकमेकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. या उलट समोरासमोर संवाद करताना, तुम्हाला एकमेकांचा बाजू समजून घेण्याची संधी मिळते.