Desi Jugaad : अनेक लोकांना नवनवीन कपडे खरेदी करायला आवडतात. अशात जर जुने कपडे असतील तर काही काळानंतर ते वापरत नाहीत. विशेषत: जीन्स अनेकदा आपण जुनी झाली की वापरणे सोडून देतो. पण, आज आपण जुनी जीन्स पुन्हा कशी वापरावी आणि तिचा पुन्हा उपयोग कसा करावा, हे जाणून घेऊ या.
टेडी बिअर
जुन्या जीन्सपासून तुम्ही टेडी बिअर बनवू शकता. टेडी बिअर बनवायला तुमचा जास्त वेळ खर्च होणार नाही. नंतर तुम्ही टेडी बिअरवर आवडीप्रमाणे सजावट करू शकता.
बॅग
जर जुनी जीन्स असेल तर फेकू नका, त्यापासून तुम्ही सुंदर बॅग बनवू शकता. तुम्हाला आवडेल त्या आकाराची आणि डिझाइनची तुम्ही बॅग बनवू शकता.
खुर्ची कव्हर
जुन्या जीन्सपासून तुम्ही खुर्ची कव्हरही बनवू शकता. फक्त खुर्चीच्या आकाराचे कव्हर तुम्हाला शिवून घ्यावे लागेल.
हेही वाचा : भारतातील दहा सर्वात सामान्य नावं; तुमचे नाव यात आहे का?
मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब कव्हर
मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब अत्यंत गरजेच्या वस्तू आहेत. दैनंदिन जीवनामध्ये याचा सर्वाधिक वापर केला जातो. अशात या गोष्टींची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. जुन्या जीन्सचा वापर करून तुम्ही मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबसाठी कव्हर बनवू शकता. ही कव्हर अतिशय आकर्षक दिसतात.
ॲप्रॉन
जुन्या जीन्सचा वापर करून तुम्ही ॲप्रॉन बनवू शकता. डेनिमचे ॲप्रॉन खूप सुंदर दिसते. हे बनवायलाही खूप सोपे आहे. तुम्ही युट्यूबवरील व्हिडीओ पाहून घरच्या घरी ॲप्रॉन बनवू शकता.
खेळणी ठेवण्यासाठी बॅग
अनेकदा लहान मुले खेळताना खेळण्यांचा ढीगभर पसारा करतात. अशावेळी सर्व खेळणी व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही जीन्सपासून बॅग बनवू शकता. या बॅगमध्ये तुम्ही मुलांची खेळणी ठेवू शकता.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)