उन्हाळा सुरू झाला की बाजारात आंबा येण्यास सुरुवात होते. हे फळ प्रत्येकजण आवडीने खातात, पण तुम्हाला माहित आहे का, आंब्याची साल तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतात. मात्र तुम्ही देखील आंबा खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देत असाल तर ही चूक कधीही करू नका. चला तर मग जाणून घेऊया आंब्याची साल आपल्यासाठी कशी फायदेशीर ठरू शकते.

आंबा हे गोड आणि रसाळ फळ खाताना बहुतेक लोक त्याची साल फेकून देतात. त्यांचं असं म्हणणं असतं की साल खाल्ल्याने आंब्याची चव बिघडते. परंतु तुम्ही ते खाऊ शकता. कारण ते खाल्ल्याने तुम्हाला कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण

एका अहवालानुसार, आंब्याच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे आपल्याला कर्करोगापासून वाचवतात, आंब्याची साल फुफ्फुसाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, मेंदूचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यापासून बचाव करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. तसेच, आंब्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायटोन्यूट्रिएंट्स आढळतात.

याशिवाय वजन कमी करायचे असेल तरी देखील आंब्याची साले खाऊ शकता. असे मानले जाते की त्याची साल वजन कमी करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. म्हणजेच वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांनी आंब्याची साल अजिबात फेकू नये. कारण त्यामुळे तुमचे वाढलेले वजन कमी होऊ शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader