दिवाळी म्हटली की दिवे, फटाके, खरेदी यांबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे फराळाचे पदार्थ. आता दिवाळीला काहीच दिवस बाकी आहेत. घरोघरी फराळाचे पदार्थ करण्याची तयारीही सुरु झाली असेल. दिवाळीचा फराळ करताना घरातील महिला पदार्थांच्या तयारीसाठी किंवा तळलेले पदार्थ ठेवण्यासाठी सर्रास वृत्तपत्राचा वापर करतात. परंतु वृत्तपत्रावर वापरलेली शाई आणि त्याचा कागद हा आरोग्यासाठी चांगला नसतो. त्यामुळे आरोग्याला धोका उद्भवून प्रसंगी गंभीर आजार उद्भवण्याचाही शक्यता असते. तेव्हा पाहूया याविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. वर्तमानपत्रातील शाई तेलकट पदार्थांमध्ये सहज शोषली जाते. शाईमधील ग्राफाईट हा घटक घातक असल्याने त्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो.

२. शरीरातील विषारी घटक मूत्रविसर्जनातून किंवा शौचातून बाहेर पडतात परंतु ग्राफाईट शरीरात साचून राहतो. त्याचा परिणाम किडनी आणि फुफ्फुसांवर होतो.

३. न्यूजपेपरमधल्या शाईतील सॉल्वंट्स पचनक्रियेत बिघाड करते. तसेच हार्मोन्सच्या पातळीमधील संतुलन बिघडवते. परिणामी कॅन्सरचा धोका वाढतो.

४. पेपरपेक्षा मासिकाचा कागद तुम्हांला अधिक चांगला वाटत असल्यास हा तुमचा गैरसमज आहे. कागद अधिक ग्लॉसी बनवण्यासाठी तसेच शाई स्प्रेड होऊ नये म्हणून वापरले जाणारे घटक जास्त धोकादायक असतात.

५. पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करा. टिश्यू पेपर किंवा टॉवेल घाऊक घेतल्यास फार महाग पडत नाहीत.

६. तुम्हाला हे कागद आणणे शक्य झाले नाही आणि कागद लागतच असेल तर किमान छपाई न केलेला कागद वापरा. त्यामुळे तुमची दिवाळी नक्कीच आरोग्यदायी होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont use newspaper for food items in diwali injurious to health
Show comments