Doormat Cleaning: घराच्या बाहेर डोअरमॅटवर पाय पुसून मग घरात प्रवेश करायची चांगली सवय अनेकांना असते. काहीजण डोअरमॅटचा वापर हा शूज किंवा चपला साफ करण्यासाठीही करत असतात. डोअरमॅटला अनेकजण पायपुसणी असेही म्हणतात. पाय पुसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या पायपुसणीचा वापर नियमितपणे होत असतो. सतत वापर केल्याने पायांना लागलेली घाण डोअरमॅटला लागते. परिणामी ते खराब होते. अशा वेळी जर तुम्ही डोअरमॅट धुवून स्वच्छ केले नाही, तर त्याचा वापर करुन पाय साफ करणे शक्य होणार नाही. त्यामुळे डोअरमॅटला चिकटलेली घाण ही घरभर पसरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजकाल बऱ्याचजणांच्या घरी व्हॅक्यूम क्लीनर हे उपकरण असते. या उपकरणाचा वापर करुन डोअरमॅट साफ करता येते. यामुळे डोअरमॅटला लागलेली घाण नाहीशी होते. त्याशिवाय त्यावरचे डागदेखील गायब होतात. पण कधीकधी व्हॅक्यूम क्लीनर वापरुन सुद्धा डोअरमॅट पूर्णपणे स्वच्छ होत नाही. ही गोष्ट तुमच्याकडे कोणत्या प्रकारची डोअरमॅट आहे यावरुन सुद्धा ठरत असते.

रबर बेस असलेले डोअरमॅट्स

रबर बेस असलेल्या डोअरमॅट्सचा वापर गेल्या काही वर्षांमध्ये वाढला आहे. या डोअरमॅट्स तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये धुवू शकता. पण त्याआधी क्लीनिंग इंस्ट्रक्शनची माहिती घेणे आवश्यक आहे. मॅट क्लीनर, डिटर्जेंट आणि पाणी यांचा वापर करुन रबर डोअरमॅट्स साफ करता येतात. रंग टिकून राहावा यासाठी तुम्ही अशा डोअरमॅट्स धुतल्यानंतर उन्हामध्ये सुकायला ठेवू शकता.

दोऱ्यांपासून बनवले जाणारे डोअरमॅट्स

नारळाच्या दोऱ्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या डोअरमॅट्सना आपण पायपुसणी म्हणत असतो. या पायपुसण्या खूप दिवस टिकून राहतात. यांच्यामध्ये पाणी शोषण्याची क्षमता असते. कॉर्नस्टार्च आणि बेकिंग सोडा एकत्र करुन घरातील पायपुसणी स्वच्छ करु शकता. त्या मिश्रणामध्ये थोड्या प्रमाणात डिटर्जेंट टाकणे फायदेशीर ठरते.

आणखी वाचा – पाण्याची बाटली खराब झाल्यास कशी करावी साफ? जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

या Doormat Cleaning Tipsचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

  • व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करुन डोअरमॅट आठवड्यातून किमान एकदातरी साफ करावी.
  • तुम्ही डोअरमॅट जमिनीवर झटकून त्यातील धूळ साफ करु शकता.
  • डोअरमॅन पाण्याने धुण्यासाठाी कधीही Strong Detergent चा वापर करु नये. याऐवजी बेकिंग सोडा वापरावा.
  • दर दोन वर्षांनी घराबाहेरील डोअरमॅट बदलावी.