Dosa For Healthy Hair: केस गळण्याचा त्रास काही नवीन नाही; पण यामुळे तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वावरही परिणाम होतो. केस लांबसडक व दाट दिसावेत, असं प्रत्येकालाच वाटतं. केस गळण्याची अनेक कारणं असू शकतात. आपल्या केसांचे आरोग्य निश्चित करण्यात आपला आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. जर तुम्हाला केस अकाली पांढरे होणे, केसांची मुळे कमकुवत झाल्यामुळे जास्त केस गळणे असा अनुभव येत असेल, तर तुमच्या आहारात बायोटिन, मॅग्नेशियम, तांबे आणि जस्ताची कमतरता असण्याची दाट शक्यता आहे. या अत्यावश्यक पोषक घटकांनी समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमच्या केसांचे आरोग्य सुधारू शकते. अलीकडील पोषणतज्ज्ञ रचना मोहन यांनी केसांचे आरोग्य वाढविण्यासाठी एक साधी आणि स्वादिष्ट भारतीय रेसिपी शेअर केली आहे. हा स्वादिष्ट नाचणी डोसा चणे-नारळाच्या चटणीसोबत खाल्ला जातो. याच्या सेवनानं तुमची केसगळती थांबू शकते, असा दावा करण्यात आला आहे.

या डोसा रेसिपीमध्ये वापरण्यात येणारे चार मुख्य घटक जे केसांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट आहेत, ते म्हणजे नाचणी (डोशात वापरली जाणारी) आणि चणे, दही व खोबरे (चटणीमध्ये वापरलेले साहित्य).

Causes of unwanted hair growth
Facial Hair : हनुवटी आणि गालावर भरपूर केस येतात? मग ‘ही’ असू शकतात कारणे; करू नका दुर्लक्ष
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Items in your kitchen that are linked to Cancer World Cancer Day 2025
महिलांनो कॅन्सरपासून वाचायंच असेल तर स्वयंपाक घरातील “ही” भांडी आताच बाहेर काढून टाका
Hair serums demystified: Guide to help you choose one based on your hair type which Hair Serum for Hair Growth
तुमच्या केसांसाठी कोणते सिरम योग्य आहे? डॉक्टरांनी सांगितलेली माहिती एकदा वाचाच, केस दिसतील चमकदार
Society confronts reality Water cut for six days
समाज वास्तवाला भिडताना : सहा दिवस पाणी बंद…
Hair , bald , Buldhana, Ayurveda, Homeopathy ,
बुलढाण्यात टक्कल पडलेल्यांना पुन्हा केस; ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथीसह…
Should You Cook Everything In Ghee? Pros And Cons You Need To Know
जेवणात तेल वापरावे की तूप? हा प्रश्न पडलाय; महिलांनो जाणून घ्या उत्तर
Ram Kapoor followed this eating pattern to lose 55 kg
Weight Loss: ५५ किलो वजन कमी करायला अभिनेत्याने वापरला ‘हा’ फंडा; फक्त टाळा ‘या’ चुका; वाचा डॉक्टर काय सांगतात

केसांचे आरोग्य वाढविणारे यातील चार पदार्थ खालीलप्रमाणे :

१. नाचणी- लोह, कॅल्शियम व अमीनो अॅसिड यांसारख्या आवश्यक पोषक घटकांनी युक्त नाचणी टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते, केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते व केस गळणे कमी करते.

२. चणे- चण्यांमध्ये प्रथिने आणि जस्त यांचे प्रमाण जास्त असते. केसांचा कूप ही केसांच्या वाढीसाठी जबाबदार असलेली त्वचेची एक लहान रचना असते. चण्यामधील पोषक घटकांमुळे केसांच्या कूपांचे पोषण होते आणि त्यामुळे केस मजबूत व निरोगी होण्यास मदत मिळते.

३. दही प्रो-बायोटिक्स आणि प्रथिनांनी भरलेले असते. अशा दह्याचे सेवन टाळूच्या आरोग्यास प्रोत्साहन मिळते. परिणामत: केस गळण्यास कारणीभूत असलेला कोंडा आणि जळजळ कमी होते.

४. नारळ आरोग्यदायी चरबी आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. त्यामुळे नारळाचे सेवन करण्याने केशवाहिन्या मजबूत होऊन, केस तुटणे टाळले जाते आणि ओलावा प्रदान होतो.

ही रेसिपी बनविण्यासाठी वापरलेले देशी तूप हृदय, मेंदू व सांधे यांच्यासाठी आरोग्यदायी आहे, असे पोषणतज्ज्ञ सांगतात. एकत्रितपणे हे घटक टाळूचे पोषण करून, केसांची ताकद सुधारून व केसांच्या निरोगी वाढीस प्रोत्साहन देतात. केसगळतीशी लढण्यासाठी आवश्यक पोषक घटक प्रदान करतात. ही रेसिपी कशी बनवायची हे जाणून घ्या.

कृती : नाचणीच्या डोशासाठी पीठ तयार करून सुरुवात करा. सर्वप्रथम मिनी पॅनवर नाचणीच्या पिठाचे बॅटर पसरवा. थोडे देशी तूप टाका. आता बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, भोपळी मिरची व किसलेले गाजर घाला. थोडे किसलेले चीज डोशावर टाका. दोन्ही बाजूंनी चांगले शिजू द्या. तुमचा भाज्यांसोबतचा नाचणी डोसा तयार आहे.

हेही वाचा >> रिकाम्या पोटी थोडा वेळ राहिल्यास तुमचंही डोकं दुखतं का? यामागचं कारण ऐकून धक्का बसेल

चटणीसाठी : मिक्सरमध्ये भाजलेले चणे, हिरवी मिरची, आले, नारळाचे तुकडे व दही घाला. चटणी तयार करण्यासाठी हे सर्व चांगल्या रीतीने मिसळा. मोहरी आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करा. चटणीमध्ये फोडणी मिसळा. आता पौष्टिक चटणी तयार आहे. नाचणीच्या डोशासोबत खा आणि आनंद घ्या!

निरोगी केसांसाठी या आरोग्यदायी घटकांचा आणि रेसिपीचा तुमच्या आहारात समावेश करा.

Story img Loader