Dosa For Healthy Hair: केस गळण्याचा त्रास काही नवीन नाही; पण यामुळे तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वावरही परिणाम होतो. केस लांबसडक व दाट दिसावेत, असं प्रत्येकालाच वाटतं. केस गळण्याची अनेक कारणं असू शकतात. आपल्या केसांचे आरोग्य निश्चित करण्यात आपला आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. जर तुम्हाला केस अकाली पांढरे होणे, केसांची मुळे कमकुवत झाल्यामुळे जास्त केस गळणे असा अनुभव येत असेल, तर तुमच्या आहारात बायोटिन, मॅग्नेशियम, तांबे आणि जस्ताची कमतरता असण्याची दाट शक्यता आहे. या अत्यावश्यक पोषक घटकांनी समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमच्या केसांचे आरोग्य सुधारू शकते. अलीकडील पोषणतज्ज्ञ रचना मोहन यांनी केसांचे आरोग्य वाढविण्यासाठी एक साधी आणि स्वादिष्ट भारतीय रेसिपी शेअर केली आहे. हा स्वादिष्ट नाचणी डोसा चणे-नारळाच्या चटणीसोबत खाल्ला जातो. याच्या सेवनानं तुमची केसगळती थांबू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा