आजच्या काळात तरुणांना आपला जोडीदार निवडण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्येच अनेक विवाहसंस्था आणि त्यांच्या वेबसाइट्सचा समावेश होतो. बहुतांश तरुण लग्नासाठी या साइट्सवर आपले नाव नोंदवतात. तथापि, या साइट्सवर फसवणूक होण्याच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या घटनाही नाकारता येत नाहीत. अशातच कोणत्याही व्यक्तीला, कोणते प्रोफाइल योग्य आहे हे अचूक ओळखणे कठीण असते. काही लोकं खोटी प्रोफाइल बनवून किंवा आपली ओळख लपवून इतरांची फसवणूक करण्याची संधी शोधत असतात. याव्यतिरिक्त अनेकदा काही प्रकरणात लोक पैशांची मागणी देखील करतात. या परिस्थितीपासून वाचण्यासाठी या साइट्सवरील अशा प्रोफाइलची सत्यता कशी पडताळता येते हे जाणून घेऊया.

एका फोटोच्या मदतीतून जाणून घेऊ शकतो बरंच काही

असे म्हणतात एक फोटो बरंच काही सांगू शकतो. कोणत्याही साईटवर प्रोफाइल बनवण्याआधी आपल्याला आपला फोटो अपलोड करावा लागतो. खरंतर एका योग्य मॅट्रिमोनिअल आयडीसाठी प्रोफाइल फोटो अत्यंत आवश्यक असतो. त्यामुळे प्रोफाइल फोटो नसणारे कोणतेही आयडी तुम्ही शॉर्टलिस्ट करू नका. याशिवाय फोटो पाहून तुम्ही त्या व्यक्तीच्या वयाचा अंदाज बांधू शकता. तसेच, जर कोणी आपला प्रोफाइल फोटो जास्तच एडिट केला असेल तर त्या व्यक्तीपासून दूरच राहावे.

four online scams
डिजिटल अटक ते रोमान्स स्कॅम : ऑनलाइन घोटाळ्यांना लोक कसे बळी पडत आहेत? काय आहेत फसवणुकीचे नवीन प्रकार?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
sweets can be adulterated in pune there is no checking mechanism because of election
पुणेकरांना तुमच्या मिठाईत भेसळ आहे? तपासणारी यंत्रणाच नाही कारण निवडणूक; जाणून घ्या नेमका प्रकार
cyber crime
सायबर गुन्हेगारांकडून खरेदीसाठी आमिष दाखवून फसवणूक
Fact Check News
Fact Check : लॉरेन्स बिश्नोईच्या हत्येसाठी बक्षीस जाहीर होतात खरंच राज शेखावत यांना झाली मारहाण? वाचा, सत्य काय आहे?
Dating App Fraud
Dating App Fraud: धक्कादायक! एक कोल्ड्रिंक पडलं १६ हजारांना; डेटिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Rajasthan gang arrested for deceiving couriers with drugs
पिंपरी : कुरीअरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगून फसवणार्‍या राजस्थानच्या टोळीचा पर्दाफाश; पाऊणकोटीचा मुद्देमाल जप्त
How To Avoid Scams During Diwali
How To Avoid Scams : डिजिटल फ्रॉडपासून सावध राहा; नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचा सल्ला वाचा

समलैंगिक जोडप्यांना पहिल्या डेटसाठी मिळणार हक्काचं ठिकाण; ‘या’ भारतीय अ‍ॅपचा वापर करून बुक करता येणार रेस्टॉरंट

मूलभूत माहितीच्या आधारे तपासा सत्यता

याशिवाय कोणत्याही मॅट्रिमोनिअल साइटवर आयडी बनवण्याआधी आपली मूलभूत माहिती देणे गरजेचे असते. परंतु जर एखाद्या आयडीवर ही मूलभूत माहिती सांगितली गेली नसेल तर अशा लोकांपासून सावध राहा. याव्यतिरिक्त जर माहिती दिली गेली असेल तर ती माहिती तपासून पाहा. जर आपल्याला कोणत्याही प्रकारची शंका असल्यास विचार करून निर्णय घ्यावा.

वारंवार प्रोफाइल बदलणाऱ्यांपासून सावधान

अनेक लोक मॅट्रिमोनिअल साइट्सवर वारंवार आपली प्रोफाइल एडिट करत असतात. जसे की सातत्याने फोटो बदलत राहणे, जात बदलणे. अशा स्थितीत अशा लोकांपासून सावधान राहणे गरजेचे आहे. कारण अशा लोकांच्या प्रोफाइलमधील सत्यता फार कमी असते.

पैसे मागणाऱ्यांपासून रहा सावध

जर या साइट्सच्या माध्यमातून कोणीही तुमच्याकडे पैशांची मागणी करत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण मॅट्रिमोनिअल वेबसाइट्सच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी दुसऱ्या लोकांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. त्यामुळे जर कोणतीही व्यक्ती या साइट्सच्या माध्यमातून तुमच्याकडे पैशांची मागणी करत असेल तर त्या व्यक्तीपासून दूर राहा.