Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025 Wishes In Marathi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिलला देशभरात साजरी केली जाते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस भारतात उत्साहाने साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या या विशेष प्रसंगी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना हे मेसेज, व्हॉट्सॲप शुभेच्छा पाठवून खास शुभेच्छा देऊ शकता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश व सुंदर ग्रीटिंग्स WhatsApp, Facebook, Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता.
Ambedkar Jayanti 2025 Messages In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी शुभेच्छा
भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवतेचे पुजारी डॉ.बाबासाहेबांना नमन
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
न्याय, समता, बंधुता यासाठी लढणाऱ्या महामानवाला सलाम
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!!!
शिकण्याचा हक्क आणि न्याय मिळवण्याची ताकद देणाऱ्या महामानवाला सलाम
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
समाजाच्या उन्नतीसाठी लढलेला युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
तुम्हाला तुमचे हक्क मिळवायचे असतील संघर्ष करायला शिका. त्यानंतरच तुम्हाला तुमचे हक्क मिळतील असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. – डॉ बाबासाहेब आंबेडकर
डॉ बाबासाहेब आंबेडकर – “माणसाने आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा.”-
बाबासाहेबांचे विचार अमर राहोत
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाठवा प्रेरणादायी शुभेच्छा (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025 Quotes in Marathi)
एक विचार, एक क्रांती
महामानवाला अभिवादन
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवतेचे पुजारी डॉ.बाबासाहेबांना नमन
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
आज बाबासाहेबांची जयंती!
त्यांचा आदर्श आपल्यासाठी दीपस्तंभ आहे
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
ज्यांनी अंधारात प्रकाश दिला, त्या महामानवाला वंदन
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
सर्वांना समान हक्क मिळवून देणाऱ्या महामानवाला नमन
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
जय भीम!!!
दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच,
पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला घडवून गेले,
अरे या मूर्खांना अजून कळत कस नाही,
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
जय भीम!!!
हवा वेगाने नव्हती
हवे पेक्षा त्यांचा वेग होता…
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा
इरादा नेक होता….!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाही तर जगात एक होता….!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
जय भीम || जय शिवराय
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
|| जय भीम ||
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरांसारखे होते जीवन,
तो माणूस बनवून गेला..
आम्ही होतो गुलाम,
आम्हाला बादशाह बनवून गेला…
जय भीम….
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!