DR. Babasaheb Ambedkar Inspiring Quotes In Marathi : भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी दरवर्षी ६ डिसेंबर रोजी साजरा केली जाते. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीत त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून पाळला जाऊ लागला. यानिमित्ताने दरवर्षी मोठ्या संख्येने अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमीवर दाखल होतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजासाठी, विशेषत: सामाजिक समता, न्याय आणि मानवी हक्कांसाठी मोठा लढा दिला, उच्च शिक्षणा घेत त्यांनी समाजातील जाती-पातीवरुन होणारा भेद रोखण्याचे कार्य केले. त्याचबरोबर दलित, वंचित, मजूर, महिला यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध उभे राहून त्यांनी प्रदीर्घ लढा दिला.
त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार आजही आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि खंबीर बनण्याची प्रेरणा देतात. तुम्हीही त्यांचे विचार तुमच्या जीवनात अंमलात आणून तुमचे जीवन बदलू शकता. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया त्यांच्या प्रेरणादायी आणि अनमोल विचारांबद्दल-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार | Dr. Babasaheb Ambedkar’s Death Anniversary Mahaparinirvan Din 10 Inspirational Quotes)
१) मोठ्या गोष्टीचे बेत आखत
वेळ दवडण्यापेक्षा छोट्या गोष्टीने
आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२) जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३) हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४) नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
५) शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
६) सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
७) कोणत्याही समाजाची उन्नती ही त्या
समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
८) दुसऱ्याच्या सुख दुखाःत भागीदार होण्यास शिकणे हेच खरे शिक्षण आहे
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
९) उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१०) काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका-
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर