Dragon fruit benefits: अलीकडे ड्रॅगन फ्रूट हे फळ बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. शरारीतील पेशी कमी झाल्यावर डॉक्टर रुग्णांना हे फळ खाण्याचा सल्ला देतात. त्याशिवाय हे फळ खाल्ल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. खरं तर, या फळाबद्दल माहितीचा अभाव असल्यामुळे अधिकाधिक लोकांकडून त्याचा फायदा घेतला जात नाही. त्यामुळेच आज आपण ड्रॅगन फ्रूट कसे खावे, ते खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे जाणून घेणार आहोत. त्याशिवाय कोणत्या कारणांसाठी ते खावे? याचीदेखील माहिती घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ड्रॅगन फ्रूट खाण्याची योग्य पद्धत कोणती?

ड्रॅगन फ्रूट खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ते धुऊन त्याचे दोन तुकडे करा आणि नंतर आतमधील लगदा चमच्याने बाहेर काढून खा.

ड्रॅगन फ्रूट खाण्याचा दुसरा मार्ग म्हणजे लगद्यावरील साल हळुवारपणे काढून टाकणे आणि नंतर ते खाणे. फक्त हे लक्षात ठेवा की, ते सोलल्याशिवाय खाऊ नका.

ड्रॅगन फळ कधी खावे?

नाश्त्यानंतर ड्रॅगन फ्रूट खावे. नाश्त्यानंतर फळांचे सेवन केल्याने पचनसंस्थेला जलदपणे काम करण्यास मदत होते. ते साखर लवकर तोडते आणि सर्व पोषक घटक पुरवते. म्हणून ड्रॅगन फ्रूट जेवणादरम्यान खावे.

तसेच रात्रीदेखील ड्रॅगन फ्रूट खाण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम ते पचन जलद करण्यास आणि नंतर वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. पण, जेव्हा आपण ते रात्री खातो तेव्हा चांगली झोप लागते आणि हार्मोनल आरोग्यदेखील चांगले राहते.

ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे

त्वचेसाठी फायदेशीर

ड्रॅगन फ्रूट खाण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम ते क जीवनसत्त्व आणि विशिष्ट अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. हे दोन्ही घटक शरीरात कोलेजन बूस्टर म्हणून काम करतात आणि नंतर वृद्धत्व कमी करण्यास मदत करतात. थोडक्यात या फळाच्या सेवनामुळे पेशींचे वृद्धत्व कमी होते आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात,.

केसांसाठी चांगले

ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅरोटिनॉइड्स आणि हेल्दी फ्लेवोनॉइड्स असतात, जे प्रदूषणामुळे होणारे केसांचे नुकसान कमी करू शकतात. ते केस मऊ आणि चमकदार बनवतात, ज्यामुळे त्यांचे सौंदर्य वाढते. त्याशिवाय या फळात भरपूर प्रमाणात क जीवनसत्त्व असते, जे केसांचा पोत सुधारण्यास मदत करते.

हेही वाचा: बदलत्या हवामानात सर्दी-खोकला दूर करण्यासाठी प्या ‘या’ पानांचा आयुर्वेदिक काढा

वजन कमी करण्यास उपयुक्त

वजन कमी करण्यासाठीही ड्रॅगन फ्रूट खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये भरपूर फायबर असते, जे पचनक्रिया वेगवान करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी, तुम्ही ते सॅलड म्हणून खाऊ शकता किंवा तुम्ही स्मूदी म्हणूनदेखील खाऊ शकता, जे जलद वजन कमी करण्यास मदत करते. तेव्हा या सर्व कारणांसाठी तुम्ही ड्रॅगन फ्रूट आवर्जून खावे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dragon fruit benefits for skin and hair know the right way and time to eat sap