Dried Lemons Uses: उन्हाळ्यात लिंबू भरपूर प्रमाणात वापरले जाता. लिंबू पाणी तयार करुन पितात तसेच इतर ज्युस किंवा ड्रिंक्समध्ये देखील लिंबूचा वापर केला जातो. ताजे लिंबूचे फायदे जवळपास सर्वांनाच माहित आहे आणि त्याचा वापर कसा करू शकता हे देखील माहित आहे. पण लिंबू सुकल्यानंतर त्याचे काय करावे हे फार कमी लोकांना माहित असते. खरं तर सुकलेले लिंबातून सहज रस निघू शकतो आणि जर रस निघाला तरी अगदी थोडा असतो. ताजे लिंबू एक ते २ आठवड्यांमध्ये सुकून जातात आणि बाहेरून कडक होऊ लागतात, तसेच ते बाहेरून काळे दिसू लागतात ज्यामुळे त्याचा वापर करण्याऐवजी लोक तो कचऱ्यामध्ये टाकून देतात. तुम्हीही जर सुकलेले लिंबू फेकून देत असताल तर ही चूक करू नका कारण त्यचा अनेक प्रकारे वापर केला जाऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुकलेले लिंबू कसे वापरावे?

सुकलेल्या लिंबाची चव आंबट आणि गोड होते. या लिंबाचा वापर आहारात वेगवेगळ्या प्रकारे केला जाऊ शकतो. सुप, स्टू, करी किंवा मासे इत्यादी पदार्थ तयार करताना सुकलेले लिंबू वापरू शकता. सुकलेले लिंबू कापून पाण्यामध्ये टाकून ते पाणी पिऊ शकता किंवा हर्बल टी तयार करण्यासाठी वापरू शकता.

चॉपिंगबोर्ड साफ करण्यासाठी

सुकलेले लिंबू वापरून चॉपिंग बोर्ड साफ करणे शक्य आहे. चॉपिंग बोर्डवर (Chopping Board) भाजी- फळे कापली जातात. त्याला साबणाने साफ करण्याबरोबर जर सुकलेल्या लिंबानेही साफ केले जाऊ शकते. सुकलेल्या लिंबू नॅचरल क्लिंझरप्रमाणे काम करते आणि चॉपिंग बोर्डाला चमकवू शकते. चॉपिंग बोर्डवर थोडे मीठ टाका आणि त्यावर लिंबाने घासून सफाई करा.

हेही वाचा – झोप पूर्ण न झाल्यास तुम्हाला व्हर्टिगोचा त्रास होऊ शकतो का? काय सांगते संशोधन, वाचा 

भांडी धुवू शकता

काही भांड्यामध्ये जर चिकट किंवा वास येणारे पदार्थ केल्यास ते तेलकट होतात. त्यामुळे अशा भांड्याना साफ करण्यासाठी सुकलेले लिंबू वापरू शकता. सुकलेले लिंबू भांड्यावर घासल्याने त्याचा चिकटपणा निघून जाईल.

हेही वाचा – दिवसाची सुरुवात Detox Drink घेऊन करावी का? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या

क्लीनिंग एजेंट
घरात फरशी किंवा भिंतीच्या टाईल्स किंवा किचन टॉपची सफाई करण्यासाठी सुकलेले लिंबू वापरू शकता. त्यामुळे घरामधील क्लीनिंग एजेंट म्हणून सुकलेले लिंबू वापरू शकता. क्लीनिक एजंट तयार करण्यासाठी सुकलेले लिंबू कापा, त्यात मीठ टाका आणि पाणी टाकून काही वेळ उकळा. मिश्रण उकळून थंड करून सफाईसाठी वापरू शकता. घराचा काना-कोपरा चमकू लागेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dried lemon uses how to use dried lemon for cleaning and cooking tips and tricks snk
Show comments