स्वयंपाकघरात नेहमीच्या मसाल्यामध्ये आवर्जून वापरण्यात येणारा पदार्थ म्हणजे ‘तमालपत्र’ होय. याच्या वापराशिवाय ‘खडा मसाला’ पूर्ण होऊ शकत नाही. तमालवृक्षाच्या पानांना ‘तमालपत्र’ असे म्हणतात. मराठीत ‘तमालपत्र’, हिंदीमध्ये ‘तेजपत्ता. आपल्या स्वयंपाकघरात मसाला म्हणून वापरले जाणारे तमालपत्र तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का? . तमालपत्र ही औषधी वनस्पती असून त्याचे अनेक फायदे आहेत. तमालपत्र शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. हे किडनीच्या आरोग्यास मदत करते.

तमालपत्र पाण्यात उकळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट घटक शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. सकाळी तमालपत्राचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. चला जाणून घेऊया तमालपत्राचे पाणी आणि त्याचे फायदे.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
Prime Minister Narendra Modis announcement to give guaranteed price of 6 thousand for soybeans
सोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका

तमालपत्राचे पाणी कसे बनवायचे

सर्व प्रथम काही ताजी तमालपत्र घ्या. ही पाने नीट धुवून घ्या. एक ग्लास पाणी घ्या आणि उकळी आणा. पाणी उकळल्यावर त्यात तमालपत्र टाका. त्यांना ५ ते १० मिनिटे पाण्यात उकळा. यानंतर गॅस बंद करून पाणी थोडे थंड होऊ द्या. आता हे पाणी गाळून घ्या, कपमध्ये काढून गरमागरम प्या. तुम्हाला हवे असल्यास त्यात थोडे आले किंवा लिंबाचा रस घालू शकता.

त्याचे फायदे जाणून घ्या

  • तमालपत्राचे पाणी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मदत करते. हे आपली भूक कमी करते आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते.
  • यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
  • तमालपत्राच्या पाण्यात असलेले अँटीऑक्सिडंट आपल्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.
  • पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता आणि अपचन दूर करण्यात मदत होते.
  • शरीरात ऊर्जा आणते आणि थकवा दूर होतो.
  • रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.
  • मधुमेहाच्या रुग्णांसाठीही तमालपत्राचे पाणी रामबाण उपाय आहे. हे पाणी प्यायल्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहते.

हेही वाचा >> Benefits of Ragi in winter: नाचणी नकोशी वाटते? मग ‘हे’ फायदे वाचून नक्कीच कराल आहारात समावेश

  • तमालपत्रात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सी हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. हे फुफ्फुस आणि हृदय रोगांशी लढण्यास देखील मदत होते