लोक सकाळची सुरुवात अनेकदा चहा-कॉफीने करतात. त्यात काहीजण अशीही असतात जी वजन कमी करण्यासाठी सकाळची सुरुवात मधाचे पाणी पिऊन करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की हे पाणी तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. मधामध्ये दाहक-विरोधी, औषधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे विविध रोगांवर मात करता येते. याशिवाय, हे अनेक प्रकारे फायदेशीर देखील असू शकते. तर जाणून घ्या मधाचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी असणारे आश्चर्यकारक फायदे.
पचन आणि प्रतिकारशक्तीसाठी उत्तम
मधामध्ये फायबर असते, त्यामुळे ते पचनासाठी चांगले असते. मधाचे पाणी पोटामधील सूज कमी करते आणि पचन सुधारते. मधाचे पाणी आपल्या शरीरातील हानिकारक रसायनांचे प्रमाण कमी करते जे ब्लोटिंग आणि गॅससाठी जबाबदार असतात. याशिवाय मधामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
(रात्री झोपताना भरपूर घाम येतोय? ही ओमिक्रॉनच्या उप-प्रकार BA.5 ची नवीन लक्षणे असू शकतात)
सर्दी पासून सुटका मिळते
अभ्यासातून असे दिसून आले आहे की एक ग्लास कोमट मध पाणी प्यायल्याने सामान्य सर्दी, ताप आणि खोकला टाळता येतो. अशा परिस्थितीत तुम्ही रोज सकाळी हे जादुई मिश्रण पिऊ शकता. याने तुमची सर्दी कोणत्याही केमिकल टॅब्लेट्स खाल्ल्याशिवाय बरी होऊ शकते.
वजन कमी करण्यास उपयुक्त
बहुतेक प्रकरणांमध्ये, खराब पचन, बद्धकोष्ठता आणि इतर पाचन समस्यांमुळे वजन वाढते. मधाचे पाणी या सर्व समस्यांशी लढते आणि तुमचे मेटाबॉलिज्म वाढवते, ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. यासोबतच रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट मध पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
(हे ही वाचा: Periods Diet: जर तुम्हालाही मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्राव होत असेल तर आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा)
हृदयरोगात फायदेशीर
मधाचे पाणी प्यायल्याने शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून बचाव होतो. जर तुम्हाला तुमचा रक्तदाब, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करायचा असेल तर या जादुई पेयाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा.
निस्तेज आणि कोरडी त्वचेपासून सुटका मिळते
डिहायड्रेशनमुळे तुमची त्वचा निस्तेज आणि कोरडी होऊ शकते. त्यामुळे सकाळी योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने तुमची त्वचा दिवसभर ताजी आणि मुलायम राहते.
(हे ही वाचा: Diabetes: तुम्हालाही मधुमेह झाला आहे का? तर ही दिनचर्या पाळा, कोणतीही अडचण येणार नाही)
मध पाणी कसे बनवायचे
ते बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी गरम करा.नंतर त्यात एक चमचा मध घालून चांगले मिसळा.चांगल्या परिणामांसाठी तुम्ही त्यात १ चमचा लिंबाचा रस देखील टाकू शकता.हे पेय रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या.