Turmeric Water In Morning Health Benefits: पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये अनेक आजारांचे मुख्य कारण ठरते ते म्हणजे आपण पित असणारे पाणी. अनेकदा पाण्याच्या माध्यमातूनच शरीरात जंतू, विषाणू प्रवेश करतात. तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीनुसार या विषाणूंना लढा दिला जातो पण काही वेळा या विषाणूंची शक्ती अधिक ठरते आणि परिणामी आजार डोकं वर काढतात. पण तुम्ही तो डायलॉग ऐकलाय का काटा काट्याने काढणे.. म्हणजेच काही वेळा मूळ समस्येचे उत्तर सुद्धा त्या समस्येतच असते असं म्हणतात. आज आपण पाणी पिऊनच शरीराला सुदृढ कसे ठेवता येईल हे जाणून घेणार आहोत.
शरीर आजारमुक्त ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे डिटॉक्स. आपल्या शरीरातील जंतू- विषाणूच नव्हे तर काही अनावश्यक घटक सुद्धा तसेच पडून राहिल्याने यातून नुकसान होऊ शकते. हे घटक मलमूत्र विसर्जनातून बाहेर टाकण्यासाठी आयुर्वेदात अनेक सोपे उपाय सुचवण्यात आले आहेत. यातील एक म्हणजे हळदीचे पाणी.
भारतीय मसाल्यांमधील मुख्य भाग अशी ओळख असलेल्या हळदीला जागतिक स्तरावर औषधी वनस्पतीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. याची काही मुख्य करणे खालीलप्रमाणे..
१) हळदीमध्ये लिपोपोलीसॅचिरिड असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. परिणामी ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी होतो.
२) हळदीमुळे शरीराला बाह्य जखम देखील लवकर भरण्यासही मदत होते.
३) हळदीचे पाणी प्यायल्यास स्नायूंना मजबुती मिळते. ज्यामुळे सांधेदुखी आणि आर्थरायटिस यासारख्या आजारांचा धोका कमी होतो.
४) हळदीतील पोषण तत्त्वांमुळे खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होते.
५) हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि किडनीसाठी पोषक असणारे औषधी गुणधर्म असतात. यामुळे किडनी स्टोनसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
६) वजन कमी करू इच्छित असाल तर हळदीच्या पाण्याची नक्कीच मदत होईल. हळदीत असणाऱ्या कर्क्युमिनमुळे अतिरिक्त फॅट्स कमी होतात.
७) हळदीतील अँटी-ऑक्सिडेंटचे गुणधर्म नैराश्य कमी करण्यास मदत करतात.
८) हळद कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने पचन प्रक्रियेला वेग मिळतो.
९) मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांवर सुद्धा हळदीचे पाणी आरामदायक ठरू शकते.
१०) आपल्याकडे हळदीचे दूध आजारांपासून मुक्त करते असं म्हणतात पण तरी ज्यांना दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
हे ही वाचा<< एक महिना गहू खाणं बंद केल्यास शरीर कसं बदलेल? पोळ्या टाळून वजन कमी होणार का, वाचा तज्ज्ञांचं उत्तर
आपण हळदीच्या पाण्याची चव वाढवण्यासाठी यात अर्ध्या लिंबाचा रस, काळी मिरी पावडर, किंवा ऍपल सायडर व्हिनेगर मिसळू शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे गरज भासल्यास आपण वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या)