सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शांत झोप लागणे कठीण झाले आहे. काहींना खाण्याच्या बिघडलेल्या सवयींमुळेही झोप येत नाही. लोक रात्रभर जागे राहतात. चांगली झोप आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासोबतच सौंदर्यासाठी देखील चांगली आणि पुरेशी झोप गरजेची आहे. तर आम्ही तुम्हाला एक खास चहा सांगणार आहोत, हा चहा प्यायल्याने तुम्हाला चांगली आणि शांत झोप घेता येईल.
चांगली झोप येण्यासाठी काय करावे?
रात्री चांगली झोप येण्यासाठी केळी आणि दालचिनीचा हा खास चहा झोपण्याच्या एक तास आधी घ्या. हा चहा बनवण्यासाठी तुम्हाला काही मोजकचं आणि घरात उपलब्ध असणारे साहित्य लागणार आहे.
साहित्य :
१/२ कप पाणी
१ कच्चं केळं
१ टीस्पून दालचिनी पावडर
चहा कसा बनवायचा ?
सर्वात आधी केळं स्वच्छ धुवून घ्या आणि सालासह त्याचे लहान तुकडे करा. आता हे तुकडे चहा बनवण्यासाठी घेतलेल्या भांड्यात टाका. त्यावर एक चमचा दालचिनी पावडर घाला. आता वरून पाणी घाला आणि हे मिश्रण अगदी मंद आचेवर ५ ते १० मिनिटे शिजू द्या. केळीची साल निघायला लागली की गॅस बंद करून चाळणीतून चाळून घ्या. तुमचा चहा तयार आहे. झोपण्याच्या एक तास आधी हा चहा प्यायल्यास चांगली आणि गाढ झोप लागते.
केळं झोप येण्यास मदत करते
केळ्यामध्ये अमिनो ॲसिड, ट्रायफोटॉन आणि आरामदायी गुणधर्म असतात. त्यांचे सेवन केल्याने मेंदूमध्ये सेरोटोनिनचा स्राव होतो. सेराटोनिन एक संप्रेरक आहे, जो मेंदूला शांत करतो, झोपेला प्रोत्साहन देतो. दुसरीकडे, दालचिनी एक आयुर्वेदिक औषध आहे, ज्याचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्यांना झोपेची समस्या आहे त्यांनी दालचिनीपासून बनवलेल्या चहाचे सेवन करावे.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)