सवय, आतिथ्य, टाइमपास, तरतरी अशा अनेक सबबींखाली चहा प्यायला जातो. कित्येक कार्यालयात साध्या चहाऐवजी काळा चहा दिला जातो. सध्या लोक साधा चहा बंद करुन काळा चहा घेणे पसंद करत आहेत. आता, याच काळया चहा पिण्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता कमी होऊ शकते, असे एका परिक्षणात आढळले आहे. काळ्या चहात आढळणारी संयुगे हृदयरोग टाळण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. त्यामधील फ्लाओनाईड क्युरेसिटीन घटक रक्तवाहिन्यांचे होणारे नुकसान कमी करू शकतात. उदंरांच्या रक्तवाहिन्यांमध्ये यावर प्राथमिक अभ्यास करण्यात आल्याचे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीचे डॉ. नाताली वॉर्ड आणि प्रा. केविन क्रॉफ्ट यांनी सांगितले.

Story img Loader