बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वात जास्त दुर्लक्ष आरोग्याकडे होते. निरोगी राहण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते, पण त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होते. सकाळच्या कामाच्या गडबडीत अनेकजण नाश्ता करण्याचे टाळतात, याऐवजी फक्त कॉफी पिण्याची सवय असते. पण सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यामुळे शरीरावर काय परिणाम होतो जाणून घ्या.
रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे दुष्परिणाम:
आणखी वाचा: फळं खाताना ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका; त्यामधील पोषकतत्त्व वाया घालवणाऱ्या चुका लगेच जाणून घ्या
हॉर्मोन्सवर पडतो प्रभाव
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने त्याचा नकारात्मक प्रभाव हॉर्मोन्सवर पडतो. यामुळे हॉर्मोन्स असंतुलित होऊ शकतात.
हॉर्मोनल ॲक्ने
सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने डोकं जड वाटणे, चक्कर येणे अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच यामुळे हॉर्मोनल ॲक्नेचा त्रास होऊ शकतो.
कोलेस्ट्रॉल
कॉफीमध्ये ‘डाईटरपिन’ नावाचे ऑयली कंपाउंड असते ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढू शकते.
आणखी वाचा: चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने काय होते? जाणून घ्या याचे शरीरावर होणारे परिणाम
अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी रिकाम्या पोटी कॉफी पिणे टाळावे. कॉफी पिण्या आधी तुम्ही फळं, सुका मेवा असे पदार्थ खाऊ शकता किंवा नाश्ता करू शकता, ज्यामुळे कॉफीचा त्रास होणार नाही.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)