सध्या रस्त्यावर बघाल तिथे तुम्हाला ‘गुळाच्या चहाची’ टपरी दिसेल. आयुर्वेदामध्ये गुळाला गुणकारी म्हटले असून, गुळाचा चहा हा साखरेच्या चहापेक्षा फारच चांगला असतो असे सध्या म्हटले जाते आहे. त्यासाठी कारणदेखील तसेच आहे. गुळामध्ये नैसर्गिकरित्या असणारी जीवनसत्वे, खनिज, लोह, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअममुळे गूळ हा आपोआपच आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.
गुळाचा चहा तुमच्या पचनासाठीदेखील उपयुक्त असतो. तुमची पचनशक्ती वाढवण्यास मदत करू शकतो. त्यासोबतच या चहातून मिळणारी उब ही तुमच्या शरीरातील थकवा दूर करण्याचेदेखील काम करते, असे वेबएमडीच्या [WebMD] एका लेखात लिहिले आहे.

पण, चहामध्ये साखरेऐवजी गूळ घालून पिण्याचे काही विशेष फायदेसुद्धा आहेत, ते नक्की कोणते आहेत ते बघूया.

milk with salt being harmful for health is this true
Milk With Salt : दुधात चिमूटभर मीठ टाकून प्यायल्यास चेहऱ्याला खाज सुटते का? हा दावा खरा की खोटा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
coconut peel benefits 6 benefits of health from coconut
नारळाची साल फेकताय? थांबा! नारळाच्या सालीपासून आरोग्याला होणारे ‘हे’ ६ फायदे एकदा पाहाच
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
Is blackcurrant and chia seed water really beneficial for health Get expert advice l काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…

तर सकाळी गुळाचा चहा पिण्याचे पाच फायदे कोणते आहेत ते पाहा.

१. पचनासाठी उपयुक्त

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या [NIH] अभ्यासात, गुळाच्या चहाचे अनेक फायदे आहेत असे सांगितले असून, त्यातील एक फायदा हा पोटाच्या पचनव्यवस्थेशी संबंधित आहे. गुळाचा चहा पिण्याने अपचनाच्या समस्या दूर राहण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे गुळाच्या चहाने पचनक्रिया सुधारून, पोटाच्या अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

२. पाळीदरम्यान उपयुक्त

मासिकपाळीदरम्यान गुळाचा चहा पिणे उपयुक्त ठरू शकते. गुळात असणाऱ्या पोषक घटकांमुळे व्यक्तीला अशा दिवसांमध्ये आराम मिळू शकतो. जर एखाद्या महिलेचे या काळात पोट दुखत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तरीही गुळाच्या चहाचा उपयोग केला जाऊ शकतो.

हेही वाचा : DIY: संत्र्यापासून बनवा सुगंधी दिवा, मन आणि घर दोन्हीही राहतील प्रसन्न; कसा बनवायचा पाहा….

३. वजन कमी करणे

गुळामध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असल्याने चयापचयाची क्रिया [metabolism] सुधारून वजनावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते. म्हणजेच वजन कमी करण्यासाठीदेखील गुळाचा चहा उपयोगी ठरू शकतो.

४. डिटॉक्स

गुळाचा वापर शरीरातील अनावश्यक कचरा बाहेर काढण्यासाठी [बॉडी डिटॉक्स] केला जाऊ शकतो. गूळ हा नैसर्गिकरित्या श्वसनमार्ग, अन्ननलिका, पोट इत्यादी अवयवांची काळजी घेत असतो. त्यामुळे पोटातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकून देऊन, गूळ पोटाचे आणि शरीराचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतो.

५. प्रतिकारशक्ती वाढवणे

गुळामध्ये असणारी जीवनसत्वे, खनिजे आणि पोषक घटकांमुळे सहाजिकच गूळ आपल्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करू शकतो. म्हणून गुळाचे सेवन केल्याने आपले शरीर लहान-लहान त्रासांपासून आपला बचाव करण्यासाठी सक्षम होण्यास मदत होऊ शकते.

[टीप : वरील लेख हा मिळवलेल्या माहितीवर आधारित असून, कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]