अनेकवेळा दूध पिणे आवडत नसूनही लहानपणी जबरदस्तीने दूध प्यावे लागते. पण आता नव्या संशोधनातून आपल्या या भारतीय पारंपरिक मान्यतेला दुजोरा मिळाला आहे. ब्रिस्टॉल विश्वविद्यालयातील काही संशोधकांनी शोध लावला, की बालपणी दूध किंवा इतर डेअरी उत्पादने ज्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर गेली असतात, त्यांना वृद्धपकाळातही वेगाने चालणे जमू शकते. तसेच त्यांचे संतुलन बिघडत नाही.
बालपणी दूध प्यायल्यास वृद्धपकाळात शरीर थकत नाही असे संशोधनात स्पष्ट झाले आहे. संशोधनाच्या सुरुवातीलाच ही महत्वाची गोष्ट समोर आली आहे. डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार ही माहिती महत्वपूर्ण ठरत आहे, कारण वृद्धपणी फ्रॅक्चर झाल्यास त्यावर उपाय करणे अधिक सोपे होते. वृद्धावस्थेत संतुलन बिघडल्याने फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो.
दूध हे पाणी, मेदाम्ले, प्रामुख़्याने प्रथिन, आणि शर्कराचे मिश्रण आहे. याशिवाय सोडियम, पोटॅशियम, कॅलशियमचे क्षार, आणि सूक्ष्म प्रमाणात फॉस्फरस पेंटाऑक्साइड, अ आणि ड जीवनसत्व असते. दुधामध्ये काहीं प्रमाणात जीवाणूप्रतिबंधक आणि कवकप्रतिबंधक विकरे असतात.

Story img Loader