दुधात भरपुर प्रमाणात कॅल्शियम आढळते. त्यामुळे लहान मुलांची हाडं मजबुत व्हावी यासाठी त्यांनी दररोज किमान एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कॅल्शियमसह दुधात अनेक पोषकतत्त्वे आढळतात. त्यामुळे लहान मुलांसह मोठ्यांना देखील दररोज दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. जर सकाळी नाश्त्याच्या वेळी कोणी दूध पित असेल किंवा इतर वेळीही दूध पिताना त्याबरोबर काहीतरी खाण्याची अनेकांना सवय असते. पण दुधाबरोबर काही पदार्थ खाल्ल्याने ते शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते. कोणते आहेत ते पदार्थ जाणून घ्या.

दुधाबरोबर पुढील पदार्थ खाणे टाळा

  • जर दुधाबरोबर मीठ असणारे पदार्थ खाल्ले तर फॅटी लिवरची समस्या उद्भवू शकते. मीठ असणारे पदार्थ आणि दूध यांचे एकत्र सेवन केल्याने मेटाबॉलिजमवर नकारात्मक परिणाम होतो.
  • दुधाबरोबर मीठ असणारे पदार्थ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. तसेच यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची ही शक्यता असते. या कारणामुळे हृदयाचे विकार होण्याची शक्यता वाढते त्यामुळे दुधाबरोबर कधीही खारट पदार्थ खाऊ नये.
  • दुधाबरोबर खारट पदार्थ खाल्ल्यास, त्याच्या त्वचेवरही परिणाम झालेला दिसून येतो. यामुळे त्वचेवर पिंपल्स, रिंकल्स येऊ शकतात. त्यामुळे दुधाबरोबर खारट पदार्थ खाणे टाळा.
  • दुधाबरोबर मिठाचे सेवन केल्यास पोटाशी निगडित समस्याही उद्भवू शकतात. यामुळे ऍसिडिटी, अतिसार, बद्धकोष्ठता असा त्रास होऊ शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

Story img Loader