युरिक अॅसिड हे शरीरात तयार होणारे एक प्रकारचे विष आहे. ज्याची पातळी अनियंत्रित झाल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. आहारात प्युरिनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते. महिलांमध्ये यूरिक अॅसिडची नॉर्मल रेंज १.५ ते ६.० mg/dL तर पुरुषांमध्ये २.४ ते ७.० mg/dL असली पाहिजे. युरिक अॅसिडची पातळी या मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. शरीरातील यूरिक अॅसिडचे प्रमाण तेव्हा वाढते ज्यावेळी किडनी युरिक अॅसिडला लघवीद्वारे बाहेर काढत नाही. वाढते वजन, मधुमेह, औषधांचे अतिसेवन, अति प्रमाणात मद्यपान यामुळे युरिक अॅसिडचे प्रमाण झपाट्याने वाढते.
आहारात लाल मांस, स्वीटब्रेड, अँटोइव्हज, सेलफिश, सार्डिन, ट्यूना इत्यादी मासे खाल्ल्याने युरिक अॅसिडचे प्रमाण झपाट्याने वाढते. जसजसे यूरिक अॅसिड वाढते तसतसे ते हाडे आणि सांध्यामध्ये क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते, ज्यामुळे संधिरोगाचा आजार होतो. संधिवात सांध्यामध्ये वेदना निर्माण करते. युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्त पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो. तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांचे यूरिक अॅसिड जास्त आहे, त्यांनी जास्त पाण्याचे सेवन केल्यास युरिक अॅसिड नियंत्रणात राहते.
( हे ही वाचा: हिवाळ्यात पहाटेच्या वेळी वाढतो हार्ट अटॅकचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी वेळीच जाणून घ्या, नाहीतर…)
यूरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी दररोज १० ते १२ ग्लास पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो. जास्त पाणी सेवन केल्याने, किडनी शरीरातील विषारी पदार्थ सहजपणे काढून टाकण्यास सक्षम होते. युरिक अॅसिड असलेले रुग्ण गाउटचा अटॅक कमी करण्यासाठी काही खास उपायांचा अवलंब करू शकतात. चला जाणून घेऊया कोणते ५ उपायाने गाउट अटॅक कमी करता येतो.
गाउट अटॅक कमी करण्यासाठी बर्फ लावा
जर तुम्हाला गाउट अटॅक कमी करायचा असेल तर बर्फाने शेक द्या. बर्फाचे शेक दिल्यास सांधेदुखी आणि सूज यापासून त्वरित आराम मिळेल. बर्फाने शेक देण्यासाठी टॉवेलमध्ये बर्फाचा तुकडा ठेवा आणि याने सांध्यांना शेक द्या. दररोज २० मिनिटे बर्फ लावल्याने सांधेदुखी आणि सूज यापासून आराम मिळतो.
( ही ही वाचा: High Uric Acid किडनी, लिव्हर आणि हृदयासाठी ठरते घातक; तज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ ६ पदार्थ याला नियंत्रित करतात)
जास्त पाणी प्या गाउट अटॅकचा धोका कमी होईल
गाउट अटॅक कमी करायचा असेल तर जास्तीत जास्त पाणी प्या. जर यूरिक अॅसिडची पातळी जास्त होत असेल तर शरीराला हायड्रेट ठेवा. शरीराला हायड्रेट करून, आपण यूरिक ऍसिडची पातळी सामान्य करू शकता.
आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा
गाउट अटॅक कमी करायचा असेल तर आहारात फळे आणि भाज्या खा. फायबर युक्त तृणधान्यांचे सेवन युरिक अॅसिडच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
( हे ही वाचा: ‘या’ ३ आजारांमध्ये शेंगदाणे करतात विषासारखे काम; जाणून घ्या आरोग्याला कशाप्रकारे पोहोचवतात हानी)
जीवनशैलीत बदल करा
गाउट अटॅकचा धोका टाळायचा असेल तर जीवनशैलीत बदल करा. वेळेवर झोपा आणि वेळेवर जेवा. गाउट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा.