ज्याप्रमाणे तुळशीला घरी ठेवण्याचे अनेक फायदे आहेत, त्याचप्रमाणे तुळशीचा चहा पिण्याचेही अनेक फायदे आहेत. वास्तविक, तुळशीमध्ये अँटीव्हायरस, अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, कॅल्शियम यांसारखे महत्त्वाचे घटक असतात, जे आरोग्याला अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकतात. त्यामुळे त्याचा चहा पिण्याचाही सल्ला दिला जातो.
- तुळशीचा चहा पचनसंस्था सुदृढ करण्यासाठीही खूप फायदेशीर आहे. आजच्या काळात खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांना पचनाच्या अनेक समस्या भेडसावतात. अशा परिस्थितीत तुळशीच्या चहाचे सेवन केल्याने केवळ आतड्याची प्रक्रियाच सुलभ होत नाही तर गॅसची समस्या, जुलाबाची समस्या, पोटात मुरड येणे, बद्धकोष्ठतेची समस्या यापासूनही सुटका मिळते.
तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण
- चांगली झोप येण्यासाठी तुळशीचा खूप उपयोग होतो. आजच्या काळात तणाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे लोकांना झोपेची समस्या भेडसावत आहे. अशा स्थितीत चांगली झोप येण्यासाठी तुळशीचा चहा पिऊ शकता. म्हणजेच एकंदरीत इतर चहापेक्षा तुळशीचा चहा प्यायल्यास त्याचा फायदा नक्कीच होतो.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)