Drinks for Lungs: वायू प्रदूषणामुळे दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमधील आरोग्यस्थिती फार वाईट झाली आहे. प्रदूषणामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, खोकला अशा अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. याचा विपरित परिणाम विशेषत: फुफ्फुस आणि श्वसनसंस्थेवर होत आहे. अशा परिस्थितीत फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी खाण्याच्या सवयींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला असे पाच हेल्दी ड्रिंक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमच्या फुफ्फुसांना डिटॉक्स करण्यास मदत होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) हळदीचे दूध

औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेली हळद अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. यामध्ये असलेल्या कर्क्यूमिनमध्ये अँटी-एंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे फुफ्फुसातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. अशा स्थितीत दुधात हळद मिसळून प्यायल्याने खूप फायदा होतो.

२) बीटरूट रस

अॅनिमियावर मात करण्यासाठी लोक अनेकदा बीटरूट खातात. पण, हे आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्यासाठीदेखील खूप फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडंट्स आणि नायट्रेट्सने समृद्ध, बीटरूट फुफ्फुसाचे कार्य आणि ऑक्सिजन पातळी सुधारण्यास मदत करू शकते.

३) ग्रीन टी

वजन कमी करण्यासाठी लोक अनेकदा ग्रीन टी पिणे पसंत करतात. परंतु, फार कमी लोकांना माहीत असेल की, ते तुमच्या फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठीदेखील उपयुक्त आहे. हे कॅटेचिन नावाच्या अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे, ज्याचा फुफ्फुसाच्या उतींवर दाहक-विरोधी आणि संरक्षणात्मक प्रभाव होतो.

४) लिंबू आणि गरम पाणी

लिंबू व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहे, जो फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो आणि तुमची प्रतिकारशक्तीदेखील मजबूत करतो. जर तुम्हाला तुमची फुफ्फुसं मजबूत करायची असेल तर कोमट पाण्यात लिंबू मिसळून पिणे फायदेशीर ठरेल.

५) लसूण आणि पाणी

हिवाळ्यात लसूण खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. यात अँटी- एंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्मदेखील आहेत, जे तुमचे श्वसन आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात.

६) मध आणि गरम पाणी

हिवाळ्यात लोकांना घसा खवखवणे आणि खोकल्याचा त्रास होतो, म्हणून मध आणि कोमट पाणी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. याशिवाय ते प्यायल्याने श्वसनाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

७) अननसाचा रस

अननसात ब्रोमेलेन नावाचे एंजाइम असते, जे श्वसनमार्गामधील श्लेष्मा आणि जळजळ कमी करण्यास मदत करते.