ड्राय फ्रुट्स इम्युनिटी वाढवण्याबरोबरच शरीराला मजबूत ठेवण्यात मदत करते. ड्राय फ्रुट्सने आपली विटामिन, मिनरल आणि फायबरची रोजची आवश्यक तितकी गरज पूर्ण होते. त्याचबरोबर, ड्राय फ्रुट्समध्ये फोलिफेनोल नावाचा पोषक तत्व असतो. याने रक्त प्रवाह बरोबर राहतो आणि पाचनक्रिया निरोगी राहाते. ड्राय फ्रुट्सने वजन कमी होते असे मानले जाते, मात्र त्यास योग्य प्रमाणात घेतल्यास वजन वाढवताही येते. तज्ज्ञांच्या मते ड्राय फ्रुट्स वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ते तुमच्या चयापचयाची गती वाढविण्यात मदत करू शकतात आणि योग्य प्रमाणात घेतल्यास ते चरबी देखील कमी करू शकते. ड्राय फ्रुट्समध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात, त्यामुळे ते वजन कमी करण्यात मदत करू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे ड्राय फ्रुट्स वजन कमी करू शकतात

१) बदाम

तज्ज्ञांनुसार, रोज मध्यम प्रमाणात बदाम घेतल्यास शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि मोनो अनसॅच्युरेटेड फॅट मिळू शकते, जे आपल्या हृदयासाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर, बदाम मधिल विटामिन सी हे जीवनसत्व अँटिऑक्सिडेंट असून ते शरीरातील खराब कोलेस्टेरोल कमी करून ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करू शकते.

(स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते डाळिंब, जाणून घ्या इतर आश्चर्यकारक फायदे)

२) पिस्ता

पिस्त्याचे सेवन केल्याने पोटात बद्धकोष्ठता होत नाही. त्यात फायबर असल्याने पाचनतंत्र चांगले चालते. ज्यामुळे बाराच काळ आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते.

३) काजू

काजूमध्य मॅग्नेशियम असते, ते कार्बोहायड्रेट आणि मेटाबॉलिज्ममध्ये सुधार करते. बद्धकोष्ठतेपासून आराम देण्यासोबतच ते वेदनाही कमी करते.

४) खजूर

खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. खजूर दुपारच्या जेवणासाठी एख चांगला पर्याय असू शकतो. खजूरमध्य भरपूर प्रमाणात विटामिन बी हे जीवनसत्व असल्याने व्यायाम करताना ते तुमचा स्टॅमिना वाढवू शकते.

(तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे आश्चर्यकारक फायदे, पण ‘या’ गोष्टी टाळा, अन्यथा..)

5) अक्रोड

अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि अल्फा लिनोलिक अॅसिड असते जे वजन कमी करण्याबरोबरच आपले आरोग्य देखील चांगले ठेवते. दिवसातून दोन अक्रोड खालल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहाते.

६) मनुका

तज्ज्ञांनुसार मनुक्यात मिठाचे प्रमाण कमी असल्याने वजन घटवण्यासाठी ते एक चांगले पर्याय असू शकते. मनुका हे आयोडीनचे देखील चांगले स्त्रोत आहे.

७) प्रुन्स

प्रुन्स हे देशी आलुबुखाऱ्याचे सुकवलेले रूप आहे. प्रुन्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आहे. प्रुन्सचे सेवन केल्याने पोटात बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही आणि आतड्याचे आरोग्य सुधारण्यासोबतच सूजही कमी होते.

(इम्युनिटी वाढवण्यात मदत करतो आवळा, फक्त खाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा)

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dry fruits could help in weight loss ssb
Show comments