शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास लठ्ठपणा आणि मधुमेह अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी अनेकजण औषधांची मदत घेतात, पण जास्त औषधं खाणेदेखील शरीरासाठी चांगले नसते. त्यामुळे यावर काही नैसर्गिक उपाय करण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी काही ड्रायफ्रुट्स मदत करु शकतात. ड्रायफ्रूट्समध्ये मुबलक प्रमाणात विटामिन आणि मिनरल्स आढळतात. आरोग्यासाठी अनेकप्रकारे फायदेशीर असणारे ड्रायफ्रुट्स शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात, कोणते आहेत असे ड्रायफ्रुट्स जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्रोड
अक्रोड शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते असे मानले जाते. तसेच यामध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारे ओमेगा ३ ॲसिड देखील आढळते.

पिस्ता
पिस्तादेखील शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये फायबर पोटॅशियम अँटिऑक्सिडंट अशी अनेक पोषकतत्वे आढळतात. त्यामुळे याचा आहारात समावेश केल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Eye Care Tips : एलर्जीपासून डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील उपयुक्त

बदाम
बदामामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, विटामिन ई आणि मॅग्नेशियम आढळते. बदाम कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरते.

याशिवाय आणखी काही पदार्थ त्यांच्या नैसर्गिक स्वरुपात खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. मैद्यासारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा वापर करण्याऐवजी गहू, ज्वारी यांच्या पीठाने बनलेल्या चपाती, भाकरी यांचा आहारात समावेश करा यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यासह डाएटमध्ये सफरचंदाचा समावेश करा, यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते. तसेच काकडी खाल्ल्यने देखील शरीरासाठी फायदेशीर असणारा कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत मिळते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dry fruits to reduce bad cholesterol in body pns