High Blood Sugar Symptoms: धावपळीच्या जीवनात, अनेक वेळा आपण शरीरातील लहान लहान बदलांकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे नंतर गंभीर आजार होण्याची शक्यता असते. तोंड वारंवार सुकणे किंवा कोरडे पडणे आणि तहान अचानक वाढणे ही अशीच लक्षणे आहेत. जर हवामान उष्ण असेल तर वारंवार तहान लागणे स्वाभाविक आहे, मात्र जर हवामान सामान्य असतानाही तोंड कोरडे जाणवत असेल तर ते रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत सावध राहण्याची गरज आहे. उच्च रक्तातील साखरेला हायपरग्लाइसेमिया म्हणतात..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर तुम्हाला हाय ब्लड शुगरबद्दल माहिती नसेल तर ते शरीरातील इतर अनेक आजारांचे कारण बनू शकते.
हाय ब्लड शुगरकडे दुर्लक्ष करणे ही एक मोठी चूक आहे. एनएचएलइन्फॉम नुसार, हायपरग्लाइसेमिया मध्ये कोरडे तोंड आणि वाढती तहान, तसेच वारंवार लघवी होणे ही लक्षणे असतात. याशिवाय, अशी अनेक लक्षणे आहेत ज्याद्वारे रोग ओळखला जाऊ शकतो.

जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते तेव्हा ‘ही’ लक्षणे दिसतात

मधुमेहावरील उपचाराबद्दल बोलायला गेलं तर यामध्ये तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. मात्र तुम्ही मधुमेही रुग्ण असल्याने तुमची साखर कधीही जास्त होऊ शकते. अशा परिस्थितीत, तुम्ही योग्य वेळी हायपरग्लाइसेमिया ओळखणे आणि त्यावर उपचार करणे महत्वाचे आहे. काहीवेळा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे हा फारसा चिंतेचा विषय नसतो, परंतु जर ही स्थिती पुन्हा पुन्हा उद्भवू लागली तर तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. कधीकधी ही स्थिती प्राणघातक देखील असू शकते.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. अशा स्थितीत अनेकांना जास्त तहान लागते आणि तोंड वारंवार कोरडे पडते, तर अनेकांना पुन्हा पुन्हा लघवी होऊ लागते. याशिवाय इतरही अनेक लक्षणे दिसू शकतात.

( हे ही वाचा: भाजलेले चणे खाल्ल्याने Blood Sugar झपाट्याने कमी होईल; खाण्याची पद्धत जाणून घ्या)

  • थकवा जाणवणे .
  • अंधुक दृष्टी
  • अचानक वजन कमी होणे
  • स्किन इन्फेक्शन
  • मूत्राशय संसर्ग

या कारणांमुळे होऊ शकते High Blood Sugar

रक्तातील साखर अनेक कारणांमुळे वाढू शकते. सर्वसाधारणपणे, जीवनशैली आणि आहार यासाठी महत्वाचे आहे. यासोबतच इतरही अनेक कारणे असू शकतात जी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल..

  • तणाव
  • आजारपणामुळे
  • जास्त खाणे
  • व्यायामाचा अभाव
  • डीहायड्रेशन
  • मधुमेहाची औषधे न घेणे
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dry mouth and excessive thirst are symptpms of hyperglycemia high blood sugar know causes and treatment gps