Best Way To Eat Dryfruits: आयुर्वेदानुसार, सुका मेवा म्हणजेच काजू, बदाम, मनुके, अंजीर हे अनेक आरोग्य समस्यांवर उपचारात्मक मानले जातात. शरीरात वात, पित्त, कफ असे दोष संतुलित करण्यासाठी तसेच पचन सुधारण्यासाठी सुद्धा याची खूप मदत होते. सुका मेवा हा ऊर्जा व आवश्यक पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. गोडाच्या पदार्थांपासून ते भाजीपर्यंत, छान चमचमीत पुलाव, बिर्याणीतही या सुक्या मेव्याचा वापर होतो. पण सुका मेवा खाताना नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे काजू, बदाम, मनुके हे भिजवून खावेत की सुके? अजूनही अनेकांना बहुप्रिय सुका मेवा खाण्याची योग्य पद्धत काय याविषयी शंकाच असते. त्यामुळे आज आपण आयुर्वेदाच्या माहितीनुसार अनेकांच्या आवडीच्या पाच सुक्या मेव्याच्या सेवनाचे नियम पाहणार आहोत.

बदाम

बदाम, विशेषत: भिजवलेले आणि सोललेले, खाल्ल्यास फायदेशीर ठरू शकतात. संधिरोगाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी तसेच पित्ताचा त्रास असल्यास बदाम भिजवून खाणे चांगले. त्याच वेळी, कफ असलेल्या लोकांसाठी, बदाम त्यांच्या तुरट गुणधर्मांमुळे अन्य ड्रायफ्रुट्सपेक्षा चांगले आहेत, परंतु ते मर्यादित प्रमाणात खावेत.

Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Alcohol Addiction and Treatment in marathi
अभिनेत्री पूजा भट्टप्रमाणे तुम्हालाही दारूचं व्यसन सोडवायचंय? डॉक्टरांचे ‘हे’ उपाय करून पाहा, पुन्हा दारूकडे ढुंकूनही बघणार नाही
Winter healthy recipe in marathi olya toorichya danyanchi bhaji recipe in marathi
चटकदार व झणझणीत विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी; हिवाळ्यातली अतिशय पौष्टीक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
Radish leaves benefits reasons why radish leaves must not be thrown away
महिलांनो तुम्हीही मुळ्याची पानं टाकून देता का? थांबा! ‘हे’ ७ फायदे वाचून कळेल किती मोठी चूक करताय
eating in a bowl is a good practice Or Not
Malaika Arora: मलायका अरोराने सांगितल्याप्रमाणे बाऊलमध्ये खाणे ‘हा’ एक चांगला पर्याय असू शकतो का? तज्ज्ञ म्हणतात की…
Six reasons to start chewing guava leaves every day
फक्त पेरु नव्हे तर पेरुची पाने देखील आहेत गुणकारी! रोज पेरुची पाने चघळण्याची सहा कारणे
Soaking Dry Fruits
रात्रभर पाण्यात भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाणं योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे उत्तर…

सुकवलेले अंजीर

अंजीर पौष्टिक आणि गोड असतात आणि वाताचा त्रास संतुलित ठेवण्यास मदत करतात. अंजीर थोडे उष्ण असू शकते, त्यामुळे पित्त असलेल्या लोकांनी ते कमी प्रमाणात सेवन करावे. जास्त प्रमाणात खाल्ल्यास कफ वाढू शकतो. त्यामुळे सुकवलेले अंजीर न भिजवता प्रमाणात खाता येऊ शकतात.

काजू

वाताचा त्रास असलेल्या लोकांसाठी काजू उत्तम आहेत, कारण ते वातांचे गुणधर्म संतुलित ठेवण्यास मदत करतात. मात्र पित्तदोष असलेल्या व्यक्तींनी जास्त प्रमाणात काजू खाणे हानिकारक असू शकते. खोकल्याचा त्रास असलेल्या लोकांसाठी, काजू समस्या आणखी वाढवू शकतो, म्हणून ते कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे. काजू सुद्धा भिजवून खाल्ल्यास पचनास मदत होऊ शकते.

खजूर

पोषक तत्वांनी युक्त खजूर वात असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहेत. हे कॅथर्टिक गुणधर्मांमुळे वात संतुलित करण्यास मदत करते. पित्तदोष असल्यास, खजूर मर्यादित प्रमाणात चांगले असू शकतात, कारण जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरात उष्णता वाढू शकते. खजूर कॅलरीजयुक्त आणि गोड असतात, त्यामुळे खोकल्याचा त्रास असलेल्यांनी हे मर्यादित प्रमाणात सेवन करावे. खजूर न भिजवता खाता येऊ शकतात.

हे ही वाचा<< २५०० कॅलरीजचे सेवन झटपट वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम? तुम्हाला फायदा होणार का, कसा असावा आहार?

अक्रोड

वातदोष असलेल्या लोकांनी अक्रोडाचे सेवन कमी प्रमाणात करावे, कारण त्यात किंचित तुरट चव असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. अक्रोड हे उष्ण आणि पौष्टिक स्वरूपाचे असल्याने पित्ताचा असलेल्या लोकांनी ते अगदी कमी प्रमाणात खावे. याशिवाय ते जड आणि तेलकटही असतात, त्यामुळे कफ लगेच होणाऱ्या लोकांनीही मर्यादित प्रमाणात त्यांचे सेवन करावे. अक्रोड भिजवून खाल्ल्यास तुरट चव कमी होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या)

Story img Loader