दुबईमध्ये होत असलेल्या २३ व्या फूड फेस्टीव्हलमध्ये केरळच्या खाद्यान्नाचा वरचष्मा राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.
शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या खाद्यान्न महोत्सवामध्ये भारतीय शेफ संजीव कपूर यांच्यासह २६ मानांकित शेफ सहभाग घेणार आहेत.  
या महोत्सवाचे आयोजन दुबईच्या पर्यटन आणि व्यापार विभागाने केले आहे. दुबईच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे  दुबईच्या पर्यटन आणि व्यापार विभागाचे संचालक हिलाल सईद अलमारी यांनी सांगितले.

Story img Loader