ख्यातनाम मोटारसायकल कंपनी Ducati ने सणासुदीचा काळ लक्षात घेऊन भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी धमाकेदार ऑफर आणली आहे. मर्यादित कालावधीसाठी ही ऑफर असणार आहे. डुकाटीच्या Scrambler 800, Multistrada आणि Diavel range मॉडल्सवर ही ऑफर मिळणार आहे. दिल्ली-एनसीआर, बंगळुरु, पुणे, मुंबई, अहमदाबाद, कोच्ची, कोलकाता आणि चेन्नई येथील सर्व डिलर्सकडे ही ऑफर उपलब्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Ducati ने एक्शन कॅमेरा बनवणारी कंपनी GoPro सोबत भागीदारी केली आहे. यामध्ये Ducati च्या Scrambler 800 रेंजमधील कोणतही मॉडल खरेदी केल्यास ग्राहकांना GoPro Hero कॅमेरा मोफत मिळेल. तर, Multistrada 950 मॉडल खरेदी केल्यास ग्राहकांना GoPro Hero 7 सिल्वर कॅमेरा मोफत मिळेल, आणि Diavel किंवा Diavel Diesel मॉडेल खरेदी केल्यास ग्राहकांना इटलीला जाण्याची संधी मिळणार आहे. इटलीच्या बोलोग्ना येथे असलेल्या डुकाटीच्या म्यूजियमची मोफत सैर कंपनीकडून मिळणार आहे. इटलीची या ट्रीपचा सर्व खर्च कंपनीकडून करण्यात येणार आहे.

या ऑफरबाबत बोलताना डुकाटी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर सर्जी केनोवस म्हणाले, आम्ही आमच्या ग्राहकांनी आनंदी राहावं यासाठी प्रतिबद्ध आहोत आणि ही ऑफर म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण आहे. GoPro सोबतची आमच्या भागीदारीमुळे ग्राहकांना त्यांचे आठवणीतले क्षण उत्कृष्ट कॅमेऱ्यात कैद करता येतील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ducati announces festive season offers free gopro hero and italy trip
Show comments