डुकाटी इंडियाने आपल्या ऑफिशियल लॉंचच्या आधी हाइपरमोटर्ड ९५० बीएस ६ बाईक १० नोव्हेंबर रोजी टीझर लॉंच होणार आहे. कंपनीने या नवीन बाईकची एक झलक जारी केली आहे. नवीन हाइपरमोटर्ड ९५० हे अपडेटेड २०२१ मॉन्स्टर नंतर भारतात डुकाटीचे पुढचे मोठे लॉंच असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवीन हाइपरमोटर्ड ९५० नवीनतम यूरो ५ एमिशन नॉर्म्सनुसार असेल. हे ९३७ सी सी डुकाटी टेस्टास्ट्रेटा ११ डिग्री व्ही-ट्विन-सिलेंडर, सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले लिक्विड-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित असेल. इंजिन ९,००० आर पी एमवर ११२.४ बी एच पी ची कमाल पॉवर आणि ७२५० आर पी एम वर ९६ एन एमचा पीक टॉर्क आउटपुट करते. ही बाईक काही निवडक आंतरराष्ट्रीय बाजारात आधीच उपलब्ध आहे.

( हे ही वाचा: Hyundai Aura vs Honda Amaze: कमी बजेटमध्ये अधिक परवडणारी आणि स्टायलिश सेडान कोणती? जाणून घ्या )

हाइपरमोटर्ड ९५०, हाइपरमोटर्ड ९५० आर व्ही इ आणि हाइपरमोटर्ड ९५० एस पी असे मोटरसायकलचे तीन प्रकार आहेत. ही बाईक भारतात हायपरमोटार्ड ९५० स्टँडर्ड आणि हायपरमोटार्ड ९५० एसपी या दोन ट्रिममध्ये सादर केली जाण्याची अपेक्षा आहे.

हायपरमोटार्ड ९५० बीएस ६ मध्ये काय असेल खास ?

मॉडेलच्या काही प्रमुख स्टाइलिंग हायलाइट्समध्ये ट्विन अंडर-सीट एक्झॉस्ट सेटअप, किमान बॉडीवर्क, एक फ्लॅट सीट, ट्रेलीस फ्रेम, ट्रेलीस सब-फ्रेम, एक रुंद हँडलबार, नकलगार्ड-इंटिग्रेटेड एलईडी ब्लिंकर्स आणि १७ इंच चाके यांचा समावेश असेल. .

डुकाटीने मोटारसायकलमध्ये एलईडी लाइटिंग, ४.३ टीएफटी डीस्प्ले, स्लिम अॅल्युमिनियम हँडलबार, काढता येण्याजोग्या पॅसेंजर फूटपेग्स आणि यूएसबी पॉवर सॉकेट यांसारखी काही अतिशय उच्च-स्तरीय फीचर्स आणि रायडर एड्स देखील सादर केली आहेत. त्याच्या इलेक्ट्रॉनिक रायडर एड्समध्ये बॉश सिक्स-एक्सिस इनर्शियल प्लॅटफॉर्म, कॉर्नरिंग एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, राइडिंग मोड्स, पॉवर मोड आणि व्हीली कंट्रोल यांचा समावेश असेल.

( हे ही वाचा: ‘या’ ३ राशीचे लोक मनाऐवजी ऐकतात डोक्याचं; व्यावहारिक राहून घेतात निर्णय! )

हायपरमोटार्ड ९५० बी येस ६ची किंमत काय असेल?

याची किंमत १२.५० लाख ते १३.५० लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे.