खोटे दागिने घालणे कमीपणाच लक्षण समजण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. उलट काळाची गरज आणि सोय म्हणून कमीत कमी सोन्यात बनवलेले किंवा खोटे दागिने घालण्याकडेच तरुण पिढीचा ओढा अधिक दिसतो. विशेषत: समाजातील एक वर्ग जो खरे दागिने वापरू शकत नाही. मग हा वर्ग नकली दागिन्यावरच हौस भागवून घेत आहे. त्यामुळेच दिवाळीच्या सणामध्ये या नकली दागिन्यांना अधिक मागणी असल्याचे दिसून येते.
महागडे उंची अलंकार घेऊन बँकेत ठेवून सणवाराला वापरण्यापेक्षा स्वस्त आणि मस्त नकली अलंकार तरुण पिढीला आवडू लागले आहेत. विशेषत: आर्थिक उत्पन्न जेमतेम असलेल्या समाजातील एका घटकांकडून विशेष मागणी असते. हे नकली अलंकारसुद्धा खऱ्या अलंकाराइतकेच सुबक आणि आकर्षक दिसतात. खऱ्या अलंकारातील रचना कौशल्यही त्यात असत. मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, सिकंदराबाद, हैदराबाद, इत्यादी शहरात नकली अलंकार बनवणाऱ्या एसील, लेडी एलिगन्स, किंग्स, अभिषेक, गोल्डन टच, आकृती, रागिणी, शुभम्, चित्रा इत्यादी नामवंत कंपन्या आहेत. प्रत्येक कंपनीच्या नकली अलंकाराचे खास वैशिष्टय़ आहे. या सर्व कंपन्यांची विविध डिझाईनमधील नकली अलंकार भव्य दुकानामध्ये बघावयास मिळतात. या दुकानातील विशेष डिझाइन्सच्या बांगडय़ा तर अगदी सोन्यासारख्या दिसतात. त्यांच्या डिझाईन्समध्येही विविधता आहे.
नेकलेससारखे सेट, अंगठय़ा, कर्णभूषणे, सुद्धा अनेक डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. बेनटेक्स कंपनीच्या साखळ्या (गळ्यातील चेन) १०० ते ४०० रुपयांपर्यंत मिळतात. मंगळसूत्रही २०० ते ३०० रुपयापर्यंत उपलब्ध आहेत. ब्रॉसवर पॉलिश केलेले असल्याने पॉलिश जाण्याची भीती नसते. हे सर्व दागिने साबनाने स्वच्छ धुता येतात. बहुतांश नागरिकांचा पॉलिश केलेल्या चांदीचे दागिने वापरण्याकडेही कल असतो. अमराठी तरुण-तरुणींमध्ये तर ते फारच लोकप्रिय आहेत. याशिवाय पांढऱ्या धातूपासून बनवलेले नेकलेस, पैजण, कमरपट्टे अगदी १५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. ते दिसायला अगदी पांढरे शुभ्र, चांदीसारखे चकचकीत व साबणाने धुता येतात. त्याला पॉलिशची गरज नसते व ते काळे पडण्याची भीती नसते. शिवाय डिझाईन्समध्येही विविधता आणि नावीन्य असते. दिवाळीच्या सणामध्ये या नकली दागिन्यांचीही उलाढाल लाखो रुपयामध्ये होत असते.
नकली दागिन्यांची ‘क्रेझ’
खोटे दागिने घालणे कमीपणाच लक्षण समजण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. उलट काळाची गरज आणि सोय म्हणून
आणखी वाचा
First published on: 06-11-2013 at 08:30 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Duplicate ornament craze in nagpur