Disease in Monsoon: सध्या पाऊस जोमात सुरू आहे. पावसाळा म्हटलं की अनेक प्रकारचे संसर्ग पसरतात. पावसाळ्यात आजारी पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. या ऋतूमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते. त्याचबरोबर या ऋतूमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया फोफावतात, त्यामुळे आहारात खूप काळजी घेण्याची गरज असते. यावेळी चांगला सकस आहार खावा असं सांगण्यात येत. या ऋतूत थोडासा निष्काळजीपणा देखील तुमच्यासाठी समस्या वाढवू शकतो. हवामानातील ओलावा आणि प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे पावसाळ्यात सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतात. याशिवाय पचनसंस्था देखील कमकुवत असते ,अशा स्थितीत जेवणात थोडेसे कमी पडल्यास पोटदुखी, संसर्ग, जुलाब, अन्नातून विषबाधा आदी समस्या उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त या ऋतूमध्ये असे अनेक आजार पसरतात, ज्यामुळे व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशा काही आजारांबद्दल ज्यांची वेळीच काळजी घेतली नाही तर आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इन्फ्लुएंझा

पावसाळ्यात इन्फ्लूएंझा प्रादुर्भावाच्या तक्रारी वाढतात. याचे विषाणू हवेद्वारे तुमच्या शरीरात प्रवेश करतात आणि तुमच्या पवननलिका आणि घशावर परिणाम करतात. यादरम्यान अति थकवा, कफ, घसा आणि शरीरात दुखणे, डोकेदुखी, छातीत दाब आणि त्वचेचा रंग निळा पडणे आदी समस्या उद्भवतात. अशी कोणतीही समस्या दिसल्यास त्वरित तज्ञांचा सल्ला घ्या. नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते.

( हे ही वाचा: पावसाळ्यात डेंग्यू-मलेरिया झपाट्याने पसरतो; अशाप्रकारे काळजी घ्या)

टायफॉयड

टायफॉइड ही देखील पावसाळ्यात लवकर उद्भवणारी समस्या आहे. याला साल्मोनेला बॅक्टेरिया जबाबदार असल्याचे मानले जाते. ही समस्या दूषित पाणी आणि अन्नामुळे होऊ शकते. याची तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी इत्यादी लक्षणे आहेत. जर तुम्हाला अशी काही समस्या असेल तर अजिबात निष्काळजी न होता त्यावर योग्य उपचार करा. टायफॉइड टाळण्यासाठी या ऋतूत बाहेरचे अन्न पूर्णपणे टाळा.

कॉलरा

दूषित पाणी प्यायल्यानेही कॉलरा आजार होतो. पावसात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे त्याची प्रकरणे वाढतात. या आजारा दरम्यान, अतिसार, उलट्या, डिहायड्रेशन आणि क्रॅम्प्सची समस्या असू शकते. हे त्रास टाळण्यासाठी बाहेरचे अन्न आणि दूषित पाणी पिणे टाळा. पावसाळ्यात नेहमी पाणी उकळून प्यावे.

( हे ही वाचा: वयाच्या ३० वर्षांनंतर प्रत्येक महिलेने ‘या’ ५ चाचण्या करायला हव्यात; जाणून घ्या माहिती)

डेंग्यू-मलेरिया

या मोसमात ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होते, त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आदींचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तीव्र ताप, अंगदुखी आणि अशक्तपणा ही त्याची लक्षणे असू शकतात. ही समस्या टाळण्यासाठी, घाण पाणी आजूबाजूला जमा होऊ देऊ नका. कूलर वेळोवेळी स्वच्छ करा. मच्छरदाणी लावून झोपा. असं केल्याने डास येणार नाहीत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During monsoon these 4 diseases can increase the problem take care of yourself in time gps
Show comments