श्रीगणेशाला दुर्वा फार आवडत असल्याने अनेक भक्त त्याच्या मूर्तीला दुर्वा अर्पण करतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की, दुर्वा तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. होय, आहारात तुम्ही दुर्वांचा समावेश करून अनेक समस्यांपासून आराम मिळवू शकता. त्यामुळे आज आपण दुर्वा सेवन केल्याने कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात जाणून घेऊ….
दुर्वांचे आरोग्यदायी फायदे
१) दुर्वांमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. जे शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेऊ शकतात, तसेच ते एक प्रतिजैविक म्हणूनदेखील वापरले जाते.
२) काही अभ्यासानुसार, मधुमेहाच्या रुग्णांनी दुर्वांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
३) दुर्वांमध्ये प्रोटीन व्यतिरिक्त कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स आढळतात, अशा प्रकारे ते बद्धकोष्ठता तसेच पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
४) जर तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही दुर्वांचे सेवन करू शकता, कारण हे डोकेदुखी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी दुर्वा आणि चुना समप्रमाणात बारीक करून हे मिश्रण कपाळावर लावा. असे केल्याने फायदा होऊ शकतो.
५) काही लोकांना नाकातून रक्त येण्याची समस्या उद्भवते, ज्यामध्ये नाकातून रक्त येऊ लागते. ही समस्या कधीकधी वेदनादायक असू शकते. यामुळे ही समस्या दूर करण्यातही दुर्वा तुमची मदत करू शकते. यासाठी तुम्ही डाळिंबाच्या फुलाचा रस दुर्वांमध्ये मिसळून पेस्ट तयार करा, यानंतर त्यातील पाणी नाकात टाकू शकता, जे नाकासाठी फायदेशीर ठरू शकते.
६) जर तुमच्या तोंडात फोड येत असतील तर तुम्ही दुर्वा वापरू शकता. जर तुम्ही दुर्वांच्या काढ्याने गुळण्या केल्यात, तर तुम्हाला तोंडाच्या फोडांपासून आराम मिळू शकतो.
७) ज्या लोकांना युरिन इन्फेक्शन आहे किंवा लघवीमध्ये रक्त येण्याची समस्या आहे, ते दुर्वा आणि दूध वापरू शकतात. याच्या मदतीने लघवीत जळजळ होण्याची समस्या तर दूर होतेच; पण घास, लघवीत वेदना, इन्फेक्शन आदी समस्यांपासूनही आराम मिळू शकतो.