Sign Of Kidney Problems: किडनीसारख्या शरीराच्या प्रमुख अवयवांची नियमित काळजी घ्यावी लागते. अस्वास्थ्यकर किडनीची अनेक चेतावणी चिन्हे आहेत ज्याकडे कधीही दुर्लक्ष करता नये, मग ते सूक्ष्म असो वा गंभीर. किडनीच्या आजाराची लक्षणे ओळखता येतात. शरीरातील दिसणारी किरकोळ लक्षणे व बदलांबाबत सदैव सतर्क राहिले पाहिजे, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या रोगाला वाव मिळणार नाही. किडनी शरीरातील रक्त शुद्ध करतात, शरीरातील कचरा आणि विषारी पदार्थ काढून टाकतात. किडनीच्या आत अनेक महत्वाच्या जैविक कार्यांसह, किडनी निकामी झाल्याची कोणतीही चिन्हे शोधणे महत्वाचे आहे जेणेकरून रोग किंवा संसर्ग सुरुवातीच्या टप्प्यावर शोधता येईल.
किडनी खराब झाल्याची लक्षणे
तीव्र थकवा
जर तुम्हाला अधिकाधिक थकवा जाणवत असेल, तर ते तुमच्या शरीरात टॉक्सिन्स तयार झाल्यामुळे असू शकते, कारण किडनी योग्य प्रकारे काम करत नाही. विषारी द्रव्ये तुमच्या शरीरातील इतर जैविक कार्यांवर परिणाम करतात आणि रक्तातील अशुद्धीमुळे इतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
( हे ही वाचा: हाता-पायांमध्ये येणाऱ्या मुंग्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नका; होईल भयंकर आजार, वेळीच जाणून घ्या कशामुळे होतो हा त्रास)
पुरेशी झोप न मिळणे
यामागे अनेक कारणे असली तरी किडनीचा आजार हे देखील एक मोठे कारण असू शकते. स्लीप एपनिया किंवा नीट झोप न येणे हे किडनीच्या आजाराशी निगडीत आहे. किडनी खराब होण्याच्या या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नका.
कोरडी आणि खाज सुटणारी त्वचा
ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास, तुमच्या डॉक्टरांना भेट द्या आणि तुमच्या किडनीची तपासणी करा. रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकताना मूत्रपिंड निरोगी त्वचेला देखील प्रोत्साहन देतात. विषारी द्रव्ये जमा झाल्यामुळे शरीरातील खनिजे आणि इतर पोषक घटकांचे प्रमाण बिघडते ज्यामुळे त्वचा आणि हाडांचे नुकसान होते.
( हे ही वाचा; कांद्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ ६ फायदे; जाणून घ्या ते कसे बनवायचे)
पाय सुजणे
एक अस्वास्थ्यकर किडनी शरीरातील विषारी द्रव्ये पूर्णपणे काढून टाकण्यास सक्षम होणार नाही, परिणामी हे विष शरीरात जमा होईल आणि त्यांची उपस्थिती दर्शवेल. त्याचप्रमाणे, जेव्हा शरीरातून अतिरिक्त सोडियम काढले जात नाही, तेव्हा ते पायांमध्ये जमा होते आणि त्यांना सूज येते.
डोळ्यांभोवती फुगणे
तुमच्या डोळ्याभोवती सूज आल्यास, तुमच्या किडनीची तपासणी करा. किडनी निकामी झाल्यामुळे लघवीतून प्रथिने बाहेर पडल्यास डोळे फुगतात.
स्नायू दुखणे
जेव्हा किडनी पूर्णपणे प्रक्रिया करू शकत नाहीत तेव्हा शरीरात टाकाऊ विषारी पदार्थांचे प्रमाण आणि खनिजांच्या अनावश्यक पातळीमुळे देखील असह्य स्नायू वेदना होऊ शकतात. स्नायू दुखणे हलके घेऊ नये.
( हे ही वाचा: चालताना नेहमी पायांवर लक्ष ठेवा; ‘हे’ १ चिन्ह दिसल्यास समजून घ्या नसांमध्ये जमा होत आहे ‘Bad Cholesterol’)
नीट श्वास घेण्यास असमर्थता
जेव्हा किडनीमध्ये समस्या असते तेव्हा रुग्णाला नीट श्वास घेता येत नाही जे एरिथ्रोपोएटिन नावाच्या हार्मोनच्या कमतरतेमुळे असू शकते. हार्मोन्स तुमच्या शरीराला लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी सिग्नल देतात. त्याशिवाय तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
लघवी करण्याची इच्छा बदलणे
अनेक लोक लघवी करण्याच्या इच्छेतील बदलांच्या आधारावर किडनीच्या आजाराचा अंदाज लावतात. जर तुमचा लघवी गेल्या काही दिवसांमध्ये नियमित वारंवारतेने वाढली किंवा कमी झाली असेल, तर उशीर करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. कदाचित वेळेवर डॉक्टरांची भेट भविष्यात कोणत्याही मोठ्या धोक्यापासून वाचवू शकते.