गुड फ्रायडे नंतर येणार रविवार इस्टर संडे किंवा इस्टर डे म्हणून ओळखला जातो. गुड फ्रायडेच्या दिवशी येशूला सूळावर चढवण्यात आले होते. ” लोकांच्या पापासाठी येशूने बलिदान दिले पण तिस-या दिवशी आपण पुन्हा जिवंत होऊ” असे येशून आपल्या अनुयायांना सांगितले होते, म्हणूनच  येशूचा प्रकटण्याचा आणि स्वर्गात आपल्या पित्याकडे जाण्याचा दिवस ईस्टर संडे म्हणून साजरा केला जातो. २५ डिसेंबर हा दिवस येशूचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो, पण गुड फ्रायडे आणि ईस्टरची तारिख मात्र ठरलेली नसते. साधरण मार्च २२ ते एप्रिल २५ च्या काळात ईस्टर येतो.

स्प्रिंग इक्विनॉक्सच्या नंतरच्या पहिल्या पौर्णिमेनंतर येणारा पहिला रविवार हा ईस्टर सण्डे म्हणून साजरा करतात. ईस्टरच्या महिनाभरह आधी येतो तो अ‍ॅश वेन्सडे. या दिवशी पुढचे चाळीस दिवस खिश्चन भाविक आपल्या आवडीच्या गोष्टींचा त्याग करतात. येशू ख्रिस्ताने लोकांच्या पापासाठी बलिदान दिले होते म्हणून त्याची परतफेड ख्रिस्ती बांधव अशाप्रकारे करतात.
सुळावर चढवण्या आधी एक दिवस येशूने आपल्या अनुयायांसोबत शेवटचे जेवण घेतले होते. उद्या इथे उपस्थित असलेल्या माझ्या जवळच्या अनुयायापैकी एक माझा विश्वासघात करून मला शत्रूच्या ताब्यात देईल, पण मला बलिदान द्यावेच लागले असेही येशू आपल्या भक्तांना म्हणाला होता.

येशू स्वत: ला देवाचा पुत्र म्हणवून घेतो असा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवून त्याला सुळावर चढवण्यात आले. पण आपल्या काही खास अनुयायांना मी पुन्हा जिवंत होईल असे सांगितले होते. हाच दिवस ईस्टर म्हणून ओळखला जातो. याला ‘रिसरेक्शन डे’ असंही म्हणतात. यानंतर काही दिवस तो आई मेरी आणि त्यांच्यावर नितांत श्रद्धा असलेल्या भक्तांना पुढचे चाळीस दिवस दर्शन देत होता. तो खंरच देवाचा पुत्र होता यावर सगळ्यांचा विश्वास हळूहळू बसला होता. म्हणून ईस्टरचे महत्त्व खूप आहे.

ईस्टरच्या सणात अंड्यालाही खूप महत्त्व आहे. अंडं म्हणजे नवीन आयुष्याच्या सुरुवातीचं प्रतीक समजतात. ईस्टर एग्ज म्हणूनही ती ओळखली जातात. या दिवशी अंड्याचे बाह्य आवरण विविध रंगानी आणि सजावटीचे साहित्य वापरून सजवले जातात. हल्ली बाजारात कृत्रिम किंवा चॉकलेट वापरूनही अंडी विक्रीसाठी ठेवली जातात. या दिवशी जास्तीत जास्त अंड्यापासून बनवलेले पदार्थ तयार केले जातात. ही पंरपरा जर्मनीतून आली असे म्हटले जाते. रशियातही ईस्टर एग सजवण्यासाची परंपरा आहे. तिथे श्रीमंत उमराव मौल्यवान खड्यांनी अंडी सजवून घेत. ईस्टरमध्ये हॉट क्रॉस बन्स बनविण्याचीही प्रथा आहे. हा क्रॉ़स येशूला सुळावर चढवला त्याचे प्रतिक आहे. यादिवशी ईस्टर एग आणि हॉट क्रॉस बन दिला जातो. ईस्टर संडे हा फार पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो.

सौजन्य  : लोकप्रभा