प्रसूतीनंतर जर तुम्ही नियमित योगा केला, तर त्यामुळे तुम्ही नक्कीच निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता. म्हणूनच, स्त्रियांनी गरोदरपणात जशी काळजी घेणे आवश्यक असते तसेच प्रसूती झाल्यानंतरही ही काळजी घेणे कायम ठेवले आहे. बऱ्याचदा प्रसूतीनंतर स्त्रिया आपल्या आरोग्याकडे फारसं लक्ष देताना दिसत नाहीत. पण ते योग्य नाही. प्रसूती नंतरच्या काळात शरीरात बरेच बदल होत असतात. या काळात स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही बदलांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
नुकत्याच माता झालेल्या स्त्रियांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश केला तर ते नक्कीच आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. आयुर्वेदिक डॉ. नितिका कोहली सांगतात कि, “प्रसूतीनंतर जर तुम्ही नियमित योगा केला, तर त्यामुळे तुम्ही नक्कीच आनंदी जीवन जगू शकता.” प्रसुतीनंतर स्तनपान करणाऱ्या मातांनी दररोज या ६ सोप्या योगासनांचा अभ्यास जरूर करावा.
शशांकासन
हे आसन केल्याने स्तनपान करणाऱ्या स्त्रियांच्या पाठीचा कणा , मान आणि हातांना लवचिकता आणि गतिशीलता मिळण्यास मदत होते.
पद्मासन
पद्मासनामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. तसेच हे आसन केल्याने मन प्रसन्न राहते आणि त्यामुळे उत्साह वाढतो. पद्मासनात बसल्याने शरीराची स्थिती अशी होते कि ज्यामुळे श्वसन आणि रक्ताभिसरण या क्रिया चांगल्याप्रकारे होऊ शकतात.
भुजंगासन
हे आसन केल्यामुळे पाठीचा कणा लवचिक बनण्यास मदत होते. तसेच पायाचे स्नायूही बळकट होतात.
बालासन
बालासन केल्यामुळे पाठीचा कणा, मांड्या आणि ओटीपोट ताणले जाऊन त्यांना आराम मिळण्यास मदत होते. याशिवाय शारीरिक आणि मानसिक ताणही कमी होतो. बालासनामुळे संपूर्ण शरीराला आराम मिळतो.
प्लॅन्क
प्रसूतीनंतर स्त्रियांनी प्लॅन्क केल्यास गरोदरपणात वाढलेले वजन कमी करण्यास मदत होते. तसेच उदरपोकळी, पाठीचे स्नायू आणि हात ताणले जाऊन त्यांना आराम मिळतो.
पश्चिमोत्तानासन
पश्चिमोत्तानासन केल्यामुळे कंबर, त्याखालील भाग आणि मांड्याना ताण मिळतो. तसेच पोटातील अंतर्गत अवयवांना मसाज होते. तुम्हाला ही आसने नियमित केल्यामुळे उत्साही, शांत आणि निरोगी वाटेल.
View this post on Instagram
( याविषयी प्रथम आपण आपले फॅमेली डॉक्टर व याविषयातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.)